सर्व नुकसानग्रस्तांना लाभ मिळावा

By admin | Published: May 22, 2015 10:18 PM2015-05-22T22:18:31+5:302015-05-23T00:34:47+5:30

आंबा नुकसान भरपाई : कणकवली पंचायत समिती सभा

All the victims are entitled to benefits | सर्व नुकसानग्रस्तांना लाभ मिळावा

सर्व नुकसानग्रस्तांना लाभ मिळावा

Next

कणकवली : आंबा नुकसान भरपाईपोटी २०१२ सालासाठी १४ लाख ७९ हजार रूपये प्राप्त झाले. शासन निकषामुळे अनेकांना या भरपाईपासून वंचित रहावे लागत आहे. सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यासाठी कृषीच्या अधिकाऱ्यांनी धोरण ठरवावे, असे आदेश सभापतींनी दिले.
पंचायत समितीची मासिक सभा येथील प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात शुक्रवारी सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती भिवा वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहाय्यक गटविकास अधिकारी मुश्ताक गवंडी उपस्थित होते. सभेत एकाही सदस्याचा लेखी प्रश्न नव्हता. मागील इतिवृत्त आढावा घेताना अवकाळीमुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई थकित असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला. २०११ साली भरपाईपोटी ७५ लाख रूपये प्राप्त झाले. २०१२ साठी १४ लाख ७९ हजार रूपये प्राप्त झाले असून २० गुंठे ते १ हेक्टर पर्यंत लाभार्थ्यांना ही भरपाई मिळणार आहे. तालुक्यात अशाप्रकारे १२५५ लाभार्थी आहेत. मात्र, या निकषामुळे २० गुंठे क्षेत्राखालील शेतकरी वंचित राहणार आहेत, असे सदस्यांनी सांगितले. खरीपासाठी तालुका कृषी विभागाकडून एकात्मिक भात विकास कार्यक्रमांतर्गत संकरीत व सुधारित बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. तालुक्यासाठी १२५ किलो बियाणे उपलब्ध आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ८०० किलो बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. खासगी कृषी सेवाकेंद्र व खरेदी-विक्री संघाकडून ५३८० किलो बियाणे उपलब्ध आहे. ३५९५ मेट्रिक टन रासायनिक खताची तालुक्यात मागणी असून ३०१ टन उपलब्ध आहे. उर्वरित खत येत्या आठ दिवसांत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ‘सह्याद्री’ बियाणे ४३३ किलो उपलब्ध असून प्रती शेतकरी १ ते ३ किलो दिले जाणार आहे. एमआरईजीएस अंतर्गत तालुक्यात १०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत ३७ लाभार्थी असून १० लाख खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे. अवकाळी पाऊस सतत पडल्याने जमीन थंड झाली आहे. नवीन बियाणे रूजणार की नाही याचा अभ्यास कृषी विभागाने केला आहे का? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी केला.
फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सची बदली झाली असून तेथे तातडीने नर्स द्यावी, अशी मागणी बबन हळदिवे यांनी केली. एनआरएचएमअंतर्गत नर्स द्यावी, असे आदेश सभापतींनी दिले. फोंडाघाट बाजारातील रस्ता दुरूस्त का करण्यात आलेला नाही, याचा संपूर्ण अहवाल मिळण्याची मागणी हळदिवे यांनी केली. फोंडा गांगोवाडी येथे गतिरोधक उभारण्याची सूचना त्यांनी मांडली. बाजारपेठेतील रूंदीकरणाला केव्हा सुरूवात होणार? असा प्रश्नही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला.
तेराव्या वित्त आयोगातील कामांची मुदत संपत आली आहे. त्या अंतर्गत कामांचा कार्यारंभ आदेश तातडीने दिले जावेत, अशी सूचना सुरेश सावंत यांनी केली. महामार्गावर खारेपाटण ते कणकवली सुलभ शौचालयाची आवश्यकता असल्याची सूचना सावंत यांनी
मांडली. (प्रतिनिधी)


निधी खर्चाबाबत तपशील द्या : हळदिवे
पंचायत समिती कार्यालयात अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी आॅडिट करायचे असून त्यासाठी २ लाख ४० हजार व्याजनिधीतून ४० हजार रूपये खर्च करता येईल, असे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित निधीचे काय करणार? असा प्रश्न बबन हळदिवे यांनी केला. मागील वर्षी सीसीटीव्हीला सदस्यांनी मंजुरी दिली. मात्र, अद्याप ते बसविण्यात आलेले नाहीत. पंचायत समितीचे प्रवेशद्वाराचे काम इतके वर्षे का राहिले? असा प्रश्न करून आतापर्यंत व्याजनिधीतून कोणत्या कामांवर किती खर्च झाला तो सादर करावा, अशी सूचना हळदिवे यांनी केली.

Web Title: All the victims are entitled to benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.