अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत नियतन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:23 PM2017-10-05T16:23:11+5:302017-10-05T16:23:11+5:30
शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी : शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुका गोदामामध्ये शिल्लक असलेला धान्यसाठा वजा करुन उर्वरित आवश्यक नियतन पुणे यांच्याकडून उचल करुन तालुकानिहाय सुधारित इष्टांकाप्रमाणे प्रत्यक्षात कार्यरत लाभार्थीसंख्या, कार्डसंख्या, मंजूर नियतन व आपल्याकडील धान्याची मागणी यावरुन तालुका व गोदामनिहाय धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
१ फेब्रुवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंत्योदय लाभार्थ्याकरिता प्रति कार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्याकरिता प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे धान्य वितरित करायचे आहे.
मंजूर नियतनानुसार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजना लाभार्थ्याकरिता गहू व तांदुळाची उचल करुन व ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ व २ रुपये प्रति किलो दराने गहू या सुधारित दराने निश्चित केलेल्या परिमाणात वाटप होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.