कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

By सुधीर राणे | Published: August 8, 2023 05:39 PM2023-08-08T17:39:18+5:302023-08-08T17:39:45+5:30

कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ

Along with the beauty of Konkan, beautification of railway stations will attract tourists, Nitesh Rane expressed confidence. | कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

कणकवली: रेल्वे स्टेशन आणि परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकाना समाधान वाटेल. कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यांतर्गत निधी देऊन कोकणच्या विकासासाठी महायुती सरकार पुढाकार घेऊन चांगले काम करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणातील जनतेच्या विकासासाठी  महायुती सरकार कायमच तत्पर राहील असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचे ऑनलाईन भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन करण्यात आले.

कणकवली रेल्वे स्थानकासाठी ६ कोटी रुपयांचा  निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे कणकवली येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कणकवली  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.

अमृत भारत योजनेच्या धर्तीवर आपल्या कोकण रेल्वेवरील प्रमुख १२ स्टेशनचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसंच अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वैभववाडी भाजप तालुका अध्यक्ष नासिर काझी, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे राजन चिके, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महिला नेत्या राजश्री धुमाळे ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Along with the beauty of Konkan, beautification of railway stations will attract tourists, Nitesh Rane expressed confidence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.