मूकबधीर माजी विद्यार्थी जेव्हा कित्येक वर्षांनी भेटतात...

By admin | Published: December 14, 2014 09:23 PM2014-12-14T21:23:51+5:302014-12-14T23:55:02+5:30

व्हॉटसअपद्वारे आता कायम संपर्कात राहण्यासाठी मुली आणि मुलगे असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत.

Alumni students who meet for many years ... | मूकबधीर माजी विद्यार्थी जेव्हा कित्येक वर्षांनी भेटतात...

मूकबधीर माजी विद्यार्थी जेव्हा कित्येक वर्षांनी भेटतात...

Next

रत्नागिरी : येथील (कै.) के. प. अभ्यंकरङ्कमूकबधीर विद्यालयातील माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींचा मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यात संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्र येऊन आपल्या अडचणी आणि भावना व्यक्त करणार आहेत. व्हॉटसअपद्वारे आता कायम संपर्कात राहण्यासाठी मुली आणि मुलगे असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत.
काही वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण आणि आता संगणक, इंटरनेट, मोबाईलच्या तंत्रयुगात किमान कौशल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. शाळा सोडल्यानंतर याचे शिक्षण मूकबधीर विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही.ङ्कमात्र, या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला, समुपदेशन देण्याचे कामङ्क संघटनेद्वारे करण्यात येणार आहे.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पहिल्या मेळाव्याला ३५ माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी मुुख्याध्यापिका अनुराधा ताटके आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजात वावरताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी ङ्कमांडल्या. ङ्कमूकबधीर विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे शिक्षण स्वत:च्या पायावर उभे करण्यास पोषक आहे. मात्र, बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करणे, संगणक, इंटरनेट, मोबाईलचा योग्य वापर केल्यास या विद्यार्थ्यांना आणखी उपयोग होऊ शकेल. याबाबत विद्यार्थ्यांनीही काही अपेक्षा व्यक्त केल्या. शाळेत शिकताना शिक्षणाचा योग्य उपयोग किंवा महत्त्व कळत नाही. पण, बोटांच्या खुणांद्वारे भावना समजून घेण्यासाठी भाषाज्ञान किती उपयुक्त आहे, हे समजल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये सांगितले.
महिन्याच्या पहिल्या रविवारी माजी विद्यार्थी एकत्र येणार आहेत. व्हॉट्सअपवर माजी विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. यामध्ये मुलींचा व मुलांचा असे दोन वेगवेगळे गट आहेत. काही शिक्षकांनाही यात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी शिक्षक, मित्रांचा आधार मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Alumni students who meet for many years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.