दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध
By admin | Published: September 30, 2016 11:11 PM2016-09-30T23:11:42+5:302016-10-01T00:22:26+5:30
प्रसन्ना कुबल : वेंगुर्लेत दिव्यांग मेळावा उत्साहात, जिद्दीने उभे राहण्याचे आवाहन
वेंगुर्ले : दिव्यांग बांधवांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता जिद्दीने समाजात उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, वेंगुर्ले नगरपरिषद त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी दिव्यांग मेळाव्यात दिली.
ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा शहरातील दिव्यांगांना नगरपरिषदेमार्फत शल्यचिकित्सक ओरोस येथे तपासणी करून
प्रमाणपत्र मिळवून देण्यात येईल, असेही कुबल यांनी सांगितले. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या व्यायामशाळेत दिव्यांगांसाठी आर्थिक अनुदान वाटप व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
नगरपालिका उत्पन्नाच्या ३ टक्के रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. तसेच या व्यतिरिक्त जी मदत दिव्यांगांना आवश्यक आहे,
ती देण्यास नगरपरिषद सदैव तयार आहे, असेही नगराध्यक्ष कुबल म्हणाले. नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, मुख्याधिकारी कोकरे व दिव्यांग कांचन घाडी यांनी
मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा नार्वेकर, नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत, नम्रता कुबल, रमण वायंगणकर, वामन कांबळे, महेश वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहायक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, समुदाय संघटक अतुल अडसुळ, सागर चौधरी यांसह नगरपरिषद कर्मचारी व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशांक मराठे यांनी केले. (प्रतिनिधी)
दीड लाख अनुदान वाटप
या मेळाव्यात छाया कोचरेकर, स्वरुपानंद गावडे, स्मिता गावडे, महम्मद नदाफ, सुभाष गावडे, प्रकाश वारंग, कांचन घाडी, चंद्र्रकांत कोळसुलकर, नमिता भगत, निखिल तोरसकर, समीर नाईक, आयरिश डिसोजा, लिलावती जाधव, सुरेश सामंत, अभय मडकईकर, अर्चना परब, नागेश परब, आकाश कांबळे, क्लॅटल आशज्ज, ध्रुव कुलकर्णी, श्रृती पाटील आदींना मिळून १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.