बांद्याची अमिषा लुडबे राज्यात प्रथम
By admin | Published: June 19, 2015 11:21 PM2015-06-19T23:21:35+5:302015-06-20T00:35:55+5:30
राष्ट्रभाषा सुबोध परीक्षा : नाबर प्रशाळेचा १०० टक्के निकाल
बांदा : कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशाळेचा हिंदी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेची अमिषा साईनाथ लुडबे या आठवीतील विद्यार्थिनीने राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेत २०० पैकी १७६ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.
पाचवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेसाठी २३ पैकी ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत, १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सहावीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्राथमिक परिक्षेत १३ पैकी ९ विद्यार्थी प्रथम, ३ विद्यार्थी व्दितीय तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. सातवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेत २० पैकी ८ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत, ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेत २२ पैकी ११ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत, १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिक्षिका कल्पना परब यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, सचिव शरदचंद्र महाबळ, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष भाऊ वाळके, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)