आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

By admin | Published: June 26, 2016 11:44 PM2016-06-26T23:44:44+5:302016-06-27T00:34:41+5:30

अपघात झाल्यास वनविभागावर गुन्हे दाखल करा

Ambalit waterfalls are scarce | आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

Next

आंबोली : आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना वनविभागाला जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
आंबोली धबधब्याजवळ पायऱ्यांचे काम करताना उंची जास्त ठेवली आहे. डाव्या बाजूने रेलींग बसविले नाही. यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. काही पर्यटक धबधब्याच्या वर चढून अपघात होतो. मात्र, त्यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून जाळी बसविण्याचे काम वनखात्याचे होते. धबधब्याची जमीन वन अखत्यारीत येत असल्याने निधी खर्च करून कामे करण्यासाठी पर्यटनाचा निधी मिळवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.
पर्यटकांची पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही केलेली नाहीत. त्यामुुळे पायऱ्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनशे झाडे धोकादायक आहेत, असा अहवाल देऊनही अद्याप तोडलेली नाहीत. मात्र, घाटात झाड पडल्यास एकही कर्मचारी तेथे येत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. घाटात दररोज दरड पडते. त्यावेळी वनखात्याकडे कर्मचारी असूनही दरड हटविण्यासाठी येत नाहीत. मग या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची व वनक्षेत्रपालांची, वनपालांची जबाबदारी काय? आतापर्यंत वनविभागाकडून घाटातील दरडीचा व धोकादायक ठिकाणांचा एकही अहवाल केंद्रीय वनखात्याकडे व पर्यावरण विभागाकडे गेलेला नाही. दरडींना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरले जाते. मात्र, खरे जबाबदार वनविभाग आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, निर्णय राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम, नितीन उम्रजकर, विलास नर, राजेंद्र शेळके, सर्फराज मुजावर, गुरूदास तेली, गजानन देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ambalit waterfalls are scarce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.