आंबोली पर्यटकांनी चिंब, मोठ्या प्रमाणात गर्दी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:52 PM2019-07-24T12:52:18+5:302019-07-24T12:53:25+5:30

उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे आंबोली मुख्य धबधबा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले पर्यटक आंबोलीत नेहमीप्रमाणे धुवाँधार पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. या रविवारी सत्तर ते ऐशी हजार पर्यटकांनी आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. आंबोली पर्यटकांनी चिंब झाली होती.

Amboli tourists chim, large crowd: Police cleans up | आंबोली पर्यटकांनी चिंब, मोठ्या प्रमाणात गर्दी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंबोली पर्यटकांनी चिंब, मोठ्या प्रमाणात गर्दी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

Next
ठळक मुद्देआंबोली पर्यटकांनी चिंब, मोठ्या प्रमाणात गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंबोली : उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे आंबोली मुख्य धबधबा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले पर्यटक आंबोलीत नेहमीप्रमाणे धुवाँधार पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. या रविवारी सत्तर ते ऐशी हजार पर्यटकांनी आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. आंबोली पर्यटकांनी चिंब झाली होती.

सुरुवातीचे तीन आठवडे पाऊसच नसल्याने पर्यटकांची संख्या नगण्य होती. परंतु आंबोलीत नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर येथील धबधबे, ओढे, नद्या पूर्ण क्षमतेने वाहू लागल्या. त्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत राहिली. गेल्या दोन रविवारांप्रमाणेच या रविवारीही सत्तर ते ऐशी हजार पर्यटकांनी आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. यामध्ये पुन्हा एकदा कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

जवळपास दीडशे पोलिसांचा फौजफाटा यावेळी येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यरत होता. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे स्वत: हजर होते. दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने वाहतुकीची कोंडी होत होती. परंतु पोलिसांनी कुशलतेने वाहतुकीची कोंडी सोडविली. सायंकाळी उशिरापर्यंत तरी कोणताही अनुचित प्रकार न घडता आंबोलीतील वर्षा पर्यटनाचा वार पार पडला.


आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी करीत पर्यटनाचा आनंद लुटला.

Web Title: Amboli tourists chim, large crowd: Police cleans up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.