...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:13 PM2017-12-07T18:13:34+5:302017-12-07T18:22:26+5:30

मिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण? जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.

... and twenty years later, Mithabao's old age came to the fireplace ... | ...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला...

मिठबांव डी.एड कॉलेज चे १९९३ ते १९९९ चे माजी प्रशिक्षणार्थी आपल्या सेवानिवृत्त प्रा. संकपाळ, प्रा. मोहिते, प्रा. बारदेस्कर, प्रा. मालंडकर यांच्या सोबत एकत्र आले.

Next
ठळक मुद्देमिठबांव नगरीत भरला गुरूशिष्याचा अनोखा मेळा २४-२५ वर्षापूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा राज्यभरातील प्रशिक्षणार्थीनी एकत्र येत अनुभवला त्याकाळचा आनंदसंयुक्त महाराष्ट्र मिठबांवमध्ये, हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅली

मिठबांव (सिंधुदुर्ग) : मिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण? जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.


मिठबांव अध्यापक विद्यालयात शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शिक्षकांचा व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या  बीस साल बाद अनोख्या स्नेहमेळाव्याचे ते निमित्त होते. सन १९९३ ते सन १९९९ सालातील तब्बल सहा बॅचच्या अध्यापक विद्यालय मिठबांवच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जुन्या आठवणी जाग्या करताना राज्यभरातून आलेले शिक्षक सहभागी झाले होते.


बीड येथून आलेल्या हालग्या कडाडल्या...विदर्भ, मराठवाडा प.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले सवंगड्यांनी हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅलीद्वारे सर्वांनी मिठबांवची आराध्य देवता श्री रामेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या स्नेह मेळाव्याचा प्रारंभ झाला.

त्यानंतर क्षा.म.स.शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. रा.का. शिरोडकर व एच.डी. गावकर, माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ज्ञ आर. आर. लोके यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक व एम.के.लोके यांच्या शुभहस्ते घालून तर व्ही.एस.डगरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.


याप्रसंगी व्यासपीठावर क्षा.म.स. शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष श्रीपाद फाटक, पदाधिकारी एम.के. लोके, .व्ही. एस. डगरे, बी. के. चव्हाण, प्राचार्य एल.एस. संकपाळ, एस.बी. सकपाळ, एच.आर. मोहिते, प्रा.एम.वाय. बारदेस्कर, प्रा.टी.व्ही. मालंडकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक नंदकुमार सोमण, पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर , नागेश फाटक, विद्यामान प्राचार्य माने, बी.के चव्हाण व इतर प्राध्यापकवर्ग व प्रत्येक बॅचचा एक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कोषाध्यक्ष प्रा. भालचंद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गिरमकर यांनी केले.

याप्रसंगी माजी प्राचार्य एल.एस. संकपाळ, नंदकुमार सोमण, यांच्यासह माजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच्यावतीने संतोष चव्हाण, रोहिदास राठोड, संतोष खामकर यांनी मनोगत केले. यावेळी २४-२५ वर्षापूर्वीच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान या सर्व बॅचच्यावतीने सर्व माजी प्राध्यापक वगार्चा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच याच विविध बॅचमधील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सहा शिक्षक तसेच याच बॅचमधील माजी प्रशिक्षणार्थी व सध्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी पुणे येथे कार्यरत असलेले राठोड यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन र्धमराज धूरत यांनी तर आभार जितेंद्र आढाव यांनी मानले. रात्री उशिरापर्यंत माजी प्राचार्य एल. एस संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भजन, गवळीचा, सुस्वर गीत गायनाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

संयुक्त महाराष्ट्र मिठबांवमध्ये

मार्गदर्शन करताना नंदकुमार सोमण म्हणाले की, आज या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे विद्यार्थी शिक्षक आल्याने मला मिठबांव मध्ये संयुक्त महाराष्ट्रच माज्यासमोर उभा असल्याचे वाटत आहे. तसेच माणसं घडविण्या-या डॉ. शिरोडकर, एच.डी. गावकर , प्रिन्सिपॉल आर.आर. लोके यासारख्या अनेक शिल्पकारांची खाण म्हणजे मिठबांव होय.

नाव उज्ज्वल करा

आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतका भव्य दिव्य कार्यक्रम केला ही अभिमानाची गोष्ट आहे. याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मिठबांव कॉलेजचे नाव असेच राज्यभर उज्ज्वल करावे. संस्थेविषयी असलेली आपुलकी, प्रेम , जिव्हाळा कायम ठेवण्याचे ही त्यांनी आवाहन करीत नियोजनबद्द कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
 

Web Title: ... and twenty years later, Mithabao's old age came to the fireplace ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.