अंध अपंगाच्या प्रश्नाबाबत जाग आणण्यासाठी नोटाचा पर्याय स्विकारा--सुनील पेडणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 02:25 PM2019-04-15T14:25:43+5:302019-04-15T14:29:28+5:30

अंध अपंगाच्या प्रश्नावर वेळ देण्यास तयार नसलेल्या लोकप्रतिनिधीना जाग आणण्यासाठी जिल्हयातील लोकांनी 'नोटा'चा वापर करावा असे

andha-apangaacayaa-parasanaabaabata-jaaga-ananayaasaathai-naotaacaa-parayaaya-savaikaaraa-saunaila | अंध अपंगाच्या प्रश्नाबाबत जाग आणण्यासाठी नोटाचा पर्याय स्विकारा--सुनील पेडणेकर

अंध अपंगाच्या प्रश्नाबाबत जाग आणण्यासाठी नोटाचा पर्याय स्विकारा--सुनील पेडणेकर

googlenewsNext
ठळक मुद्देमतदान क्रांती करण्याची हीच वेळ.... 

सावंतवाडी : अंध अपंगाच्या प्रश्नावर वेळ देण्यास तयार नसलेल्या लोकप्रतिनिधीना जाग आणण्यासाठी जिल्हयातील लोकांनी 'नोटा'चा वापर करावा असे आवाहन आज येथे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     अंध अपंगाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे लोक अपयशी ठरले आहेत त्यामुळे आता त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.त्यामुळे एक तृतीयांश विरोधात मतदान करून येथील जनतेने मतदान क्रांती करून दाखवावी असे ही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले अंधाना चांगल्या आरोग्य सेवा दिली जात नाही,सेवा दिल्या जात नाहीत त्यामुळे आता बदल करण्यासाठी आता नोटाच्या माध्यमातून क्रांती करून दाखवा असे ही त्यांनी सांगितले. आता उभे असलेल्या उमेदवारांना मतदान केल्यास मत मोदींनाच जाणार आहे. त्यामुळे आता नोटा हाच पर्याय आहे.यावेळी हरी गावकर,विठ्ठल शिरोडकर,छाया कोचरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: andha-apangaacayaa-parasanaabaabata-jaaga-ananayaasaathai-naotaacaa-parayaaya-savaikaaraa-saunaila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.