वेंगुर्ला तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती

By Admin | Published: May 25, 2017 06:19 PM2017-05-25T18:19:54+5:302017-05-25T18:19:54+5:30

एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प

Anganwadi worker recruited in Vengurla taluka | वेंगुर्ला तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती

वेंगुर्ला तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प वेंगुर्ला अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनिस या मानधनी रिक्त पदासाठी नमूद केलेल्या गाव क्षेत्रातील अंगणवाडीमध्ये खाली दर्शविले प्रमाणे नियुक्ती करण्यासाठी त्याच गाव क्षेत्रातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक ५ जून रोजी सायंकाळी ५.00 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उभादांडा - उभादांडा चमणकरवाडी-सेविका, उभादांडा- उभादांडा कुलेर्वाडी -मदतनीस, कोचरा- कोचरा चव्हाटा - मदतनिस, मातोंड - मातोंड मडवाडी - मदतनिस, मातोंड मातोंड नाटेली - मदतनिस. या पदांची भरती करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प वेंगुर्ला येथे संपर्क साधावा.

Web Title: Anganwadi worker recruited in Vengurla taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.