अंगणवाडी कर्मचाºयांचे ५ आॅक्टोबरला ‘जेल भरो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:52 PM2017-09-28T22:52:41+5:302017-09-28T22:52:41+5:30

Anganwadi workers will be arrested on 5th October 'jail bharo' | अंगणवाडी कर्मचाºयांचे ५ आॅक्टोबरला ‘जेल भरो’

अंगणवाडी कर्मचाºयांचे ५ आॅक्टोबरला ‘जेल भरो’

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : सेवाज्येष्ठता व पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत अंगणवाडी सेविका कर्मचारी संप मागे घेणार नाहीत, शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मागण्या मान्य न झाल्यास ५ आॅक्टोबरला राज्यात जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कमलताई परुळेकर म्हणाल्या की, संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सेवाज्येष्ठता व पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत संप सुरू केला आहे. या संपाला सत्तेतील शिवसेनेने, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पाठिंबा दिला आहे. असे असताना हा संप फोडण्यासाठी सरकारने नेमलेले पगारी नोकर खोटेनाटे सांगत सेवासमाप्तीच्या नोटिसा राज्यातील विविध प्रकल्पांत देत फिरत असून, कोणीही या त्यांच्या प्रयत्नांना भीक घालू नका. पाठविलेल्या सर्व नोटिसांची होळी करायची आहे, असे आवाहन परुळेकर यांनी अंगणवाडी सेविकांना केले आहे.
सीईओंचा खोटा अहवाल
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्गात अंगणवाड्या सुरू असल्याचा खोटा अहवाल प्रकल्प अधिकाºयांना पाठवून अंगणवाडी कर्मचाºयांची बदनामी केली. तसेच पाठविलेल्या नोटिशीमध्ये गैरवर्तन हा शब्द वापरणे हे चुकीचे केले असून, त्यांनी कटुता निर्माण करू नये, असा सल्ला परुळेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना दिला.
संपाला गालबोट नको
प्रशासनाने कितीही नोटिसा दिल्या तरी कोणीही संपाला गालबोट लावू नका, कारण आपला एकोपाच शासनाला धडा शिकविणार आहे, असेही परुळेकर यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाºयांना पाठविलेल्या नोटिसांची लवकरच होळी करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी ५ आॅक्टोबरला ओरोस येथे जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा परुळेकर यांनी सरकारला दिला.

Web Title: Anganwadi workers will be arrested on 5th October 'jail bharo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.