अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच राहणार : कमल परूळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:28 PM2017-09-27T16:28:15+5:302017-09-27T16:31:08+5:30
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीबाबत जी घोषणा केली, ती सेवा ज्येष्ठता व समितीचा ठराव डावलून केली आहे. त्यामुळे ही घोषणा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांचा राज्यभर सुरू असलेला संप सुरूच राहणार असल्याचे राज्य अंगणवाडी कृती समितीने स्पष्ट केले असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सचिव कमल परूळेकर यांनी दिली आहे.
कुडाळ , 27 : महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीबाबत जी घोषणा केली, ती सेवा ज्येष्ठता व समितीचा ठराव डावलून केली आहे. त्यामुळे ही घोषणा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांचा राज्यभर सुरू असलेला संप सुरूच राहणार असल्याचे राज्य अंगणवाडी कृती समितीने स्पष्ट केले असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सचिव कमल परूळेकर यांनी दिली आहे.
अंगणवाडी मदतनीस यांना ७ हजार ५०० रूपये व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना १० हजार रूपये अशी मानधनवाढ व्हावी तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार वाढ व्हावी, अशी मागणी वर्षभर आहे.
ही मागणी डावलून व समितीने केलेला एकमुखी ठराव डावलून पंकजा मुंडे यांनी मदतनीसांना १ हजार व अंगणवाडी सेविकांना १ हजार ५०० रूपये व मिनी अंगणवाडी सेविकांना १ हजार २५० रूपये अशी मानधनवाढ केल्याची घोषणा केली. ही घोषणा आम्हाला मान्य नसल्याचे राज्य अंगणवाडी कृती समितीने स्पष्ट करत राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.