राणेची अटक पोलिस कारवाईचा भाग राष्ट्रवादीचा संबध नाही: अंकुश काकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:31 PM2021-08-26T18:31:27+5:302021-08-26T18:34:19+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अकुश काकडे सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ankush kakade says narayan rane arrest is not related to ncp | राणेची अटक पोलिस कारवाईचा भाग राष्ट्रवादीचा संबध नाही: अंकुश काकडे

राणेची अटक पोलिस कारवाईचा भाग राष्ट्रवादीचा संबध नाही: अंकुश काकडे

Next

सावंतवाडी : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक पोलिसांची कारवाई आहे.त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबध नाही.मात्र सध्या चालेल्या व्यक्तीगत भांडणात आम्हाला जराही रस नाही.हे कुठेतरी आता थांबले पाहिजे यासाठी वडिलकिच्या नात्याने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे नक्कीच सल्ला देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला ते गुरूवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात सुरू असलेल्या हणा माऱ्या या व्यक्तीगत आहेत.त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही सबंध नाही.आणि त्यात आम्हाला रसही नाही.हे कुठेतरी थांबले पाहिजे आजी मुख्यमंत्र्यानी माजी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा मान ठेवलाच गेला पाहिजे पण एखाद्या मंत्र्यावर टिका टिपण्णी करतना समोरच्यानी आपली पातळी सोडता कामा नये असे मत काकडे यांनी माडले.केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक ही पोलिस प्रशासनाचा भाग आहे.त्याचा राष्ट्रवादीशी संबध जोडू नका आणि गृह विभाग जरी राष्ट्रवादीकडे असला तरी आम्ही पूर्णपणे पोलिसांना स्वतंत्र्य दिले असल्याचे काकडे यांनी सांगितले.

मात्र या घटनामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार हे सरकारच्या प्रमुखांना नक्कीच वडिलधारी म्हणून सल्ला देतील असे स्पष्ट केले महाविकास आघाडी सरकार पडावे म्हणून भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे.पण त्यांना यश येत नाही म्हणूनच अशांतता प्रस्थापित करत असून,आमचे सरकार पाच वर्षे काय?पंचवीस वर्षे चालेल असा विश्वास ही काकडे यांनी बोलून दाखवला.
 

Web Title: ankush kakade says narayan rane arrest is not related to ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.