सिंधुदुर्गातील जत्रोत्सवासाठी नियावली जाहीर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 04:42 PM2020-12-01T16:42:24+5:302020-12-01T16:43:43+5:30
Religious programme, collector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीत समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू करावी. तसेच लवकरात लवकर ती नियमावली जाहीर करावी. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी केली आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीत समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू करावी. तसेच लवकरात लवकर ती नियमावली जाहीर करावी. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अलीकडेच मंदिरे खुली झाली आहेत. तर आता सिंधुदुर्गातील ग्रामदैवतांच्या मंदिरात वार्षिक जत्रोत्सव सुरू झाले आहेत. या जत्रोत्सवात आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत सोशल डिस्टन्स पाळणे कठीण आहे.
सध्या कोरोनाशी लढा देताना सोशल डिस्टन्स पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जत्रोत्सवात गर्दी टाळावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये . यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी. असेही या पत्रात पार्सेकर यांनी म्हटले आहे.