आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

By admin | Published: December 25, 2015 09:57 PM2015-12-25T21:57:14+5:302015-12-26T00:17:00+5:30

मंगळवारी वितरण : मागील तीन वर्षांपासूनचे पुरस्कार

Announcing the Gramsevak Award | आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

Next

ओरोस : मागील तीन वर्षांतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०१२-१३, १३-१४
आणि २०१४-१५ चे प्रत्येकी ८ प्रमाणे २४ ग्रामसेवकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. मंगळवारी (दि. २९) सिंधुदुर्गनगरी येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास सहाय्य करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.शासनाने विहित केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार समितीकडून ही निवड केली जाते. जानेवारी, आॅगस्ट, सप्टेंबर २०१५ च्या निवड समिती सभेने संबंधितांची निवड केली आहे. त्यानुसार २०१२ - १३ साठी पंढरीनाथ विठ्ठलराव पांढरे ग्रामसेवक दोडामार्ग, संदीप गंगाराम गोसावी सावंतवाडी, आनंद प्रभाकर परूळेकर वेंगुर्ले, रघुनाथ वसंत भोगटे कुडाळ, चंपू दत्तात्रय रावले मालवण, मंगेश अनंत राणे कणकवली, राजेंद्र विश्वनाथ भुर्के देवगड, विनोद अशोक हरताडे वैभववाडी.सन २०१३-१४ साठी जनार्दन बाबाजी खानोलकर दोडामार्ग, मंगला रामा गवळी सावंतवाडी, विवेक रमेश वजराठकर वेंगुर्ला, ग्राम्विकास अधिकारी दिनेश शिवराम चव्हाण मालवण, ग्रामसेवक गिरीश भिकाजी धुमाळे कणकवली, संजय बापू शेळके देवगड, गोकुळ दामू कोकणी वैभववाडी.
सन २०१४-१५ या वर्षात संदिप भगवान पाटील दोडामार्ग, मुकुंद गोविंद परब सावंतवाडी, विकास आत्माराम केळुसकर वेंंगुर्ला, ग्रामविकास अधिकारी अपर्णा सचिन पाटील कुडाळ, अरुण जगन्नाथ जाधव मालवण, दीपक दत्तात्रय तेंडुलकर कणकवली, रतिलाल मगन बदिराम देवगड, दीपक संभाजी अमृतसागर वैभववाडी यांचा समावेश आहे. या २४ ग्रामसेवकांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)

तीनही वर्षासाठी आदर्श
ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्यांना येत्या मंगळवारी (दि. २९) शरद
कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे
जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते सन्मानित केले
जाणार आहे.

Web Title: Announcing the Gramsevak Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.