सुरक्षा महामंडळाचे आणखी एक प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीत होणार, पोलिस महासंचालकाची माहिती
By अनंत खं.जाधव | Published: October 2, 2024 12:03 AM2024-10-02T00:03:45+5:302024-10-02T00:04:05+5:30
Sawantwadi News: सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून,आणखी एक शंभर जणांची व्यवस्था असणारे सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी आठ कोटिचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.
- अनंत जाधव
सावंतवाडी - सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून,आणखी एक शंभर जणांची व्यवस्था असणारे सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी आठ कोटिचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता देणार आहे.तसेच या निधीतून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तथा महाव्यवस्थापकीय संचालक सुरक्षा महामंडळ बिपीन कुमार सिंग यांनी ऑनलाईन लोकमत शी बोलतना दिली आहे.
महासंचालक बिपीन कुमार सिंग हे मंगळवारी सावंतवाडीत आले होते.यावेळी त्यांनी पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रशिक्षण केंद्राची पाहाणी केली तसेच केंद्राची काहि कामे अपूर्ण आहेत.याबाबत त्यांनी बांधकाम विभागा च्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व उद्घाटनापुर्वी राहिलेली कामे पूर्ण करा असे निर्देश दिले.यात पाण्याची व्यवस्था विद्युत पुरवठा आदि कामाचा समावेश आहे.
याबाबत महासंचालक बिपीनकुमार सिंग यांना विचारले असता त्यांनी सावंतवाडीतील प्रशिक्षण केंद्र हे चांगले झाले आहे. पण इमारतीतील काहि कामे पूर्ण होणे बाकी ती कामे पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करण्यात येईल.या ठिकाणी 120 सुरक्षा बलाचे कर्मचारी थांबणार आहेत.त्यांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत हे प्रशिक्षण केंद्र सुसज्ज होणार आहे.या व्यतिरिक्त आणखी एक सुरक्षा बलाची इमारत उभी राहणार आहे यासाठी सहा कोटि रूपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव महामंडळाला पाठविण्यात आला आहे.ती इमारत आता च्या इमारती च्या बाजूलाच उभी राहणार असून या ठिकाणी 100 ते 120 प्रशिक्षणार्थी थांबतील एकूण दोनशे ते अडीचशे जणांचे वास्तव्य येथे असणार आहे.असे सिंग यांनी स्पष्ट केले.
तसेच पोलिस परेड मैदान हे सुरक्षा बलाला सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या मैदानाला सुरक्षित करण्यात येणार असल्याचे ही सिंग यांनी सांगितले.
दरम्यान सिंग यांनी भेट दिल्यानंतर त्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले यांनी स्वागत केले यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण सुरक्षा बलाचे अकाराम राणे निलेश पाटील उपविभागीय अभियंता सागर सगरे विजय चव्हाण ठेकेदार दया परब व नार्वेकर उपस्थित होते.