मुख्याधिकाऱ्यांनी आदेश धुडकावला : अपना बाजार बंदच्या आदेशाला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 06:28 PM2020-03-17T18:28:57+5:302020-03-17T18:31:18+5:30
विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले.
मालवण : मालवणचा सोमवारचा आठवडा ह्यअपना बाजारह्ण बंद ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी केल्या होत्या. त्याबाबतचे तहसील प्रशासनाकडून पालिकेला पत्र पाठविण्यात आले असतानाही सोमवारचा आठवडा बाजार भरविण्यात आला. विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले.
दरम्यान, कांदळगावकर यांनी याकडे आमदार वैभव नाईक तसेच तहसीलदार अजय पाटणे यांचे लक्ष वेधले आहे. याप्रकरणाची दखल घेत तहसीलदारांनी आठवडा बाजार सुरू ठेवण्यात आल्याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुख्याधिकाºयांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सोमवारी आठवडा बंद ठेवण्याचा नगराध्यक्षांचा आदेश मुख्याधिकाºयांनी धुडकावून आठवडा बाजार सुरू ठेवला. प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारी तहसील प्रशासनाने पालिका प्रशासनास आठवडा बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार सोमवारी आठवडा बाजार बंद राहील असे आवाहनही करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी जिल्ह्याबाहेरील विक्रेते आठवडा बाजारात दाखल झाले. याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या कर्मचाºयांनी या विक्रेत्यांना रोखले. मुख्याधिकाºयांनी भाजी विक्रीमुळे काहीही होणार नाही असे सांगत बाजार सुरू ठेवला. तसेच व्यापाºयांकडून वसुलीही करण्यात आली, असा आरोप नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केला.
लेखी स्पष्टीकरण द्या!
नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी तहसीलदार पाटणे यांचे लक्ष वेधले असता मुख्याधिकारी जावडेकर यांना तत्काळ तहसील कार्यालयात बोलावून घेण्यात आले. तहसीलदार यांनी वरिष्ठांचे आदेश असतानाही बाजार कोणत्या आधारे सुरू ठेवण्यात आला त्याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्याच्या सूचना मुख्याधिकाºयांना केल्या.