छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:45 PM2017-08-29T16:45:17+5:302017-08-29T16:45:20+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. २९ : शासन निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णय २८ जून २0१७ नुसार छत्रपती महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकरीता दिनांक २४ जुलै २0१७ पासून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आपले सरकार या पोर्टलवरील लिंक ओपन करुन दिली आहे. https://aaplesarkar.maharashtra.gov.in व https://csmssy.in या लिंकवर या योजनेचा लाभ घेण्याकरीता आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. अर्ज भरणेची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २0१७ आहे.
आपले सरकार सेवा केंद्रावर व महा ई-सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्याची सेवा मोफत आहे. या कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विहित मुदतीत लवलकरात लवकर आॅनलाईन अर्ज भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकारी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.