आॅटोरिक्षा,टॅक्सी चालकांना सर्वेक्षण नमुने भरण्याचे आवाहन

By admin | Published: April 19, 2017 02:25 PM2017-04-19T14:25:02+5:302017-04-19T14:25:02+5:30

मते समितीकडे मांडवीत

Appeal to fill up survey samples for autorickshaw, taxi drivers | आॅटोरिक्षा,टॅक्सी चालकांना सर्वेक्षण नमुने भरण्याचे आवाहन

आॅटोरिक्षा,टॅक्सी चालकांना सर्वेक्षण नमुने भरण्याचे आवाहन

Next

 आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : महाराष्ट्रातील आॅटोरिक्षा- टॅक्सी भाडेसुत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन आॅटो रिक्षा-टॅक्सी संघटनांची मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते आजमावली आहेत.

या दरम्यान विविध मुद्यावर संबंधितांमध्ये दिलेल्या मतामध्ये मत विभीन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर आॅटोरिक्षा-टॅक्सी व्यवसायीकांना त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत याकरीता समितीने संगणकीय सर्वे घेण्याचे ठरविले आहे.

विभागाच्या वेबसाईटवर आॅटोरिक्षा-टॅक्सी सर्वे नमुने जनतेला आॅनलाईन भरण्यासाठी अपलोड करण्यात आले आहेत. या वेबसाईटवर मेन मेनु या सदरात - सूचना - फिडबॅक फॉर्म नुसार सर्वे नमुने भरावेत. सर्वे नमुन्यात जनतेचा अभिप्राय, आॅटोरिक्षा चालक अभिप्राय, टॅक्सी चालक अभिप्राय, आॅटोरिक्षा-टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्वेक्षण करण्यास्तव वेबसाईट मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत.

वेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्वे नमुने दिनांक ३० एप्रिल २०१७ पर्यंत आॅनलाईन भरण्याकरिता कार्यक्षेत्रातील जनतेस, आॅटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक व आॅटोरिक्षा टॅक्सी संघटना व ग्राहक संघटना यांनी वरील कालावधीत सर्वेक्षण नमुने भरण्याचे आवाहन बाळासाहेब खंडागळे उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Web Title: Appeal to fill up survey samples for autorickshaw, taxi drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.