सचिवांच्या शिफारशींवर हरकती नोंदविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2015 10:08 PM2015-05-05T22:08:25+5:302015-05-06T00:18:17+5:30
शिक्षण विभाग :‘आॅनलाईन’चा पर्याय उपलब्ध...
टेंभ्ये : शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दि. १० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या शिफारशींवर हरकती नोंदवण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. दि. ८ मे पर्यंत या शिफारशींवर आॅनलाईन हरकती नोंदवता येणार आहेत. समितीने केलेल्या शिफारशी आहेत तशा स्वीकारल्यास माध्यमिक शाळांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.शासनाच्या ६६६.ी४िूं३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २ूँङ्मङ्म’ या लिंकवर हा अहवाल जनतेच्या हरकतीसाठी टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार शाळांचे स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार इयत्ता पाचवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांमधून इयत्ता पाचवीचा वर्ग वगळण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडण्यात येणार आहे.
इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांना इयत्ता सहावी व सातवीचे वर्ग जोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु या प्रत्येक वर्गामध्ये किमान ३५ विद्यार्थी असणे बंधनकारक करण्यास आले आहेत. विद्यार्थ्यांची अट पूर्ण झाली नाही तर या शाळेचा आठवीचा वर्ग काढून टाकण्यात येणार आहे. इयत्ता नववीची दुसरी तुकडी टिकवण्यासाठी किमान ६१ विद्यार्थीसंख्या निश्चित करण्यात आली आहे. अशा अनेक जाचक शिफारशी सुचविण्यात आल्या
आहेत.
कोकणातील प्रादेशिक प्रतिकूलता लक्षात घेता विद्यार्थीसंख्येची अट पूर्ण करणे अशक्य आहे. समितीच्या शिफारशी आहे तशा स्वीकारल्या तर कोकणातील माध्यमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळांसमोर सध्या पटसंख्येची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घटत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर होत आहे. या परिस्थितीचा विचार करुन कोकणासाठी पटसंख्येचे निकष निश्चित करणे आवश्यक आहे. या शिफारशींवर समाजातील सर्व घटकाना हरकती नोंदविता येणार आहेत. यासाठी ३ींूँी१ल्लङ्म१े२@ॅें्र’.ूङ्मे या मेल आयडीवर आपल्या सूचना ८ मे पर्यंत पाठवता येणार आहेत.
प्रधान सचिवांचा अहवाल हा आराखडा आहे. याबाबत जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. जनतेच्या अभ्यासपूर्ण सूचनांचा विचार करुनच हा अहवाल स्वीकारला जाणार आहे. यामुळे जनतेने आपल्या अभ्यासपूर्वक सूचना मांडाव्यात, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाशी रत्नागिरी येथे बोलत होते. (वार्ताहर)
सर्वांनी सूचना नोंदवा
प्रधान सचिवांच्या शिफारशी अन्यायकारक आहेत. याबाबत सर्वांनी आपल्या अभ्यासपूर्वक सूचना नोंदवण्याचे आवाहन माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले यांनी केले आहे.