पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी प्रमाणपत्र पडताळणीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:49 PM2017-08-29T16:49:48+5:302017-08-29T16:49:48+5:30
सिंधुदुर्गनगरी दि.२९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय व क्रीडा स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या व प्रथम व्दितीय, तृतीय क्रमांक प्राविण्य प्राप्त असणाºया खेळांडूनी आपले प्रमाणपत्र उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या कार्यालयामध्ये अर्ज व अजार्सोबत प्राविण्य प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडून सादर करावे व आपले प्रमाणपत्र पडताळणी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध भरतीव्दारे खेळाडूंची ५ टक्के खेळाडू कोट्यातून निवड होते. परंतु पडताळणी केलेले प्रमाणपत्र नसल्यामुळे ऐनवेळी खेळाडूंना धावपळ करावी लागते.
अशी धावपळ होवू नये यासाठी वेळीच खेळाडूंनी आपले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर यांनी केले आहे.