कर्जमाफीसाठी ३५ टक्के शेतकºयांचे अर्ज--उदय चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:09 PM2017-09-07T22:09:53+5:302017-09-07T22:12:34+5:30
सिंधुदुर्गनगरी : शेतकºयांना कर्जमाफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून, आतापर्यत अवघ्या ३५ टक्के शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : शेतकºयांना कर्जमाफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून, आतापर्यत अवघ्या ३५ टक्के शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरले आहेत. अजूनही ६५ टक्के शेतकºयांनी कर्जमाफीसाठीचे आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी लवकरात लवकर अर्ज भरून शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.
शासनाच्या कर्जमाफी संदर्भातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. मेधा वाके, जिल्हा भूमिलेख अधिकारी सानप, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनें’तर्गत थकित कर्जदार आणि नियमित फेड करणारे शेतकरी यांना कर्जमाफी, तसेच प्रोत्साहनपर योजनांतर्गत कर्जमाफी आणि२५ हजार प्रोत्साहनपर रक्कम मिळण्यासाठी सर्व शेतकºयांनी आपले आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक असल्याचे चौधरी म्हणाले.३० जून २0१६ पर्यंत ज्या शेतकºयांनी कर्ज घेऊन ते भरले नाही अशा शेतकाºयांना १ लाख ५० हजारपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहनपर २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी संबंधित सर्व शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. जर कुणी आॅनर्लाइन अर्ज भरला नाही, तर असे शेतकरी या कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केल्यापासून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी २० शेतकºयांनी अर्ज भरले होते, तर या गणेशोत्सव कालावधीत केवळ सहा हजारच शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. ही संख्या खूपच कमी आहे. आपल्या जिल्ह्यात सुमारे ७० हजार एवढे शेतकरी या योजनेचे लाभधारक आहेत, असे असताना केवळ २६ हजार जणांनीच अर्ज भरणे म्हणजे केवळ ३५ टक्केच शेतकºयांनी आतापर्यंत अर्ज भरले असल्याचे ते म्हणाले.
अर्ज भरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे
जिल्ह्यात शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यासाठी २६५ केंद्रे कार्यान्वित असून, या सर्व केंद्रांवर अर्ज भरण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया एकदम सोपी असून, आता केवळ १0 ते १५ मिनिटांमध्ये पती-पत्नी या दोघांचेही अर्ज भरून होतात. त्याचबरोबर हे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांनी आपल्यासोबत केवळ आधार कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे घेऊन जावे. खातेदार आणि त्याची पत्नी या दोघांनीही या योजनेसाठी अर्ज भरणे आवश्यक असून, १५ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज भरले गेले नाहीत, तर आपल्या बँकाही आपल्यासाठी काहीच करू शकत नाहीत, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
आठ दिवसच शिल्लक
उर्वरित सुमारे ६५ टक्के शेतकरी अजूनही अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. या सर्वांनी लवकरात लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. या योजनेअंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून, आता केवळ आठ दिवसच बाकी राहिले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्र आणि संबंधित ही सुविधा सुरू असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जाऊन शेतकºयांनी पती व पत्नी या दोघांचेही अर्ज भरावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
आकडेवारी अनिश्चित
कर्जमाफी आणि कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असताना जिल्हा प्रशासन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तसेच बँका यांच्याकडे कर्जदार शेतकरी निश्चित किती आहेत. याची अंतिम यादीच तयार नाही, याची कबुली उदय चौधरी यांनी यावेळी दिली.