भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 04:08 PM2022-02-21T16:08:45+5:302022-02-21T18:05:33+5:30

फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही

Are you coming to find a crab for your brother's search ?, MLA Nitesh Rane question to Minister Aaditya Thackeray | भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल

भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल

Next

सिंधुदुर्ग : फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही. तुम्ही बंगला तुटलाय काय ते बघायला येता आहात काय ? असा सवाल करतानाच भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधण्यासाठी येताय काय असा खोचक सवालही आमदार नितेश राणे यांनी केला. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यावरुन आमदार राणे यांनी मंत्री ठाकरे यांना टोला लगावला.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतील तर त्यांनी येथील पर्यटन व्यावसायिकांसाठी, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा ड्रायव्हिंग, व्हाटेल व्यवसायिक यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

कोरोना काळात त्यांचे सर्व व्यवसाय नुकसानीत गेले. तेव्हा तुम्ही काहीच मदत केली नाही की त्यांचे अश्रू पुसले नाहीत. आता आलाच आहात तर या पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री झाल्यापासून आज प्रथमच अडीच वर्षांनी आदित्य ठाकरे स्वतंत्र दौरा करतात, इतके दिवस तुम्हाला सिंधुदुर्गच्या जनतेची आठवण झाली नाही. म्हणजे किती प्रेम आहे हे दिसते. स्वर्गीय बाळासाहेब म्हणायचे सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा कणा आहे. त्यांचाच नातू पद स्वीकारल्यावर प्रथमच स्वतंत्र दौऱ्यावर येतात हे प्रेम काय ? असा सवाल देखील केला.

Web Title: Are you coming to find a crab for your brother's search ?, MLA Nitesh Rane question to Minister Aaditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.