ऐन गणेशोत्सवातच मोरीच्या कामाची लगबग

By admin | Published: September 19, 2015 11:45 PM2015-09-19T23:45:37+5:302015-09-19T23:46:34+5:30

दाभोली येथील प्रकार : काम आटोपण्याची घाई, चाकरमानी-भाविकांतून नाराजी

Around the time of the Gan Gan festival | ऐन गणेशोत्सवातच मोरीच्या कामाची लगबग

ऐन गणेशोत्सवातच मोरीच्या कामाची लगबग

Next

वेंगुर्ले : दाभोली येथीलि मोरीचे अर्धवट बांधकाम ऐन गणेशोत्सवातच पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला असून भाविकांतून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाकपणाचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे यासंबंधी सूचना करण्यासाठी गेलले नागरिक त्रस्त झाले आहेत.
रेडी-रेवस या सयगरी महामार्गावरून जाताना दाभोली येथील रस्ता मोरीचे बांधकाम ५ ते ६ महिन्यांपासून चालू असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने व संबंधीत ठेकेदारामुळे अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. दाभोली येथील ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधींनी या बांधकामाच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा केला. पण यामधील करण्यात येणारी टाळाटाळ ती कायमचीच राहिली. दाभोली हा सागरी महामार्गाचा मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची कायमच वर्दळ असते.
या मोरीच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामामुळे येथील साहित्य मार्गावरच पडून आहे. त्यामुळे वाहन चालकांना अडचण होत होती. तर सध्या पाऊस सुरू असल्याने याठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येथून प्रवास करणे अशक्य होत आहे.
येथे थांबवण्यात आलेल्या मोरीच्या कामाच्या पूर्ततेसाठी वारंवार तोंडी व लेखी निवेदनातून सूचना, तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावेळी विविध कारणे सांगण्यात येवून वेळ मारून नेण्यात आली. ग्रामस्थांची वारंवारची मागणी पाहून वास्तविक पाहता या मोरीचे काम गणेशोत्सवापूर्वीच होणे गरजेचे होते. पण याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थोडेही गांभिर्य घेतले नाही. एकंदरीत ग्रामस्थांच्या या मागण्यांना या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.
मोरीच्या अर्धवट बांधकामामुळे येथील वाहतूक धोकादायकरित्या सुरू आहे हे माहित असतानाही अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाचे गांभिर्य घेतले नाही. सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धांदल सुरू असताना मात्र अचानक या कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे ही वाहतूक पुन्हा अडचणींच्या विळख्यात सापडली आहे. गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी, गणेश दर्शनासाठी येजा करणारे नातेवाईक तसेच रोजची सागरी महामार्गावरील वाहनांची वर्दळ यामुळे येथे वाहनांनी रस्ता फुलला आहे. अशा अवस्थेतच विभागाने हे काम सुरू केल्याने या कामासाठी सेंट्रींग मशीन, साहित्य आणि मजुरांची ये-जा असते. यामुळे येथे अपघाताची दाट शक्यता आहे. येथील वाहन धारकांची कामगारांशी ऐन गणेशोत्सवातच सवड मिळाली का? अशा प्रश्नांवरून वादावादी पाहवयास मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची प्रचिती आली असतानाही केवळ काम आटोपण्याचाच ध्यास घेतल्याप्रमाणे याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. (वार्ताहर)
कार्यालयाचे ‘पेंटींग’ पण काम मात्र ‘पेंडींगच’
सार्वजनिक बांधकाम विभागाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. डागडुजी आणि स्वच्छता यामुळे या कार्यालयाची अवस्था जरा हटकेच झाली आहे. मात्र कार्यालयाशी संबंधीत काम पाहिले तर डोक्याला हात लावावा लागतो. महामार्गाच्या मुख्यमार्गाची रेंगाळलेली डागडुजी, पुलांची दुरूस्ती, बाजुपट्ट्यांची दुरवस्था, बाजुपट्ट्यावरील धोकादायकरित्या कोलंडलेली झाडी याबाबत कार्यालयात कसलीच हालचाल दिसत नाही. जर कोणी यासंबंधी आले तर त्याला तत्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन द्यायचे ही येथील पद्धतच बनली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
काम आटोपण्याची घाई का?
दरम्यान, या मोरीचे अर्धवट राहिलेले काम ऐन गणेशोत्सवातच का करण्याचा घाट घातला जात आहे, याबाबत ग्रामस्थांतून तर्कवितर्क व्यक्त होत आहे. एकतर या मार्गावरची वाहतुकीची वर्दळ असते, तर सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू असते त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. गणेशोत्वात याकडे कुणाचे लक्ष नसतानाही हे काम आटोपण्याची घाई का करण्यात येत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Around the time of the Gan Gan festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.