कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:18 PM2020-02-07T16:18:22+5:302020-02-07T16:19:48+5:30

कणकवली शहरातील पीटर इंग्लंड या कपड्यांच्या शोरुममधील चोरीतील पाच संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी तेथील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्या पाचही संशयितांना कणकवली पोलिसांच्या पथकाने राजापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.

 Arrest of robbery, robbery incident | कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना

कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना

Next
ठळक मुद्दे कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना पाच जणांना पोलीस कोठडी

कणकवली : कणकवली शहरातील पीटर इंग्लंड या कपड्यांच्या शोरुममधील चोरीतील पाच संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी तेथील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्या पाचही संशयितांना कणकवली पोलिसांच्या पथकाने राजापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

कणकवलीतील पीटर इंग्लंड या शोरुमचे शटर उचकटून रोख १५ हजार रुपये व कपड्यांसह सुमारे एक लाखाचा मुद्देमाल २१ जानेवारीला पहाटे चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असतानाच रत्नागिरी पोलिसांनी पाच संशयितांना मुंब्रा येथून अटक केली होती.

या अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मोहमद्द इरफान कुडूस शेख (१९ , रा. शिळफाटा - ठाणे), रिझवान अहमद मकबुल खान (२७, शिळगाव, ठाणे), मुमताज मेहराज शेख (२०, शिळफाटा - ठाणे), एजाज अली शफात अली सिद्दीकी (२५, ठाकुरपाडा-ठाणे), मुश्ताक महारुख खान (३४, रा. मुंब्रा) यांचा समावेश आहे.

संशयितांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून अटक वॉरंट घेत कणकवली पोलिसांचे पथक राजापूर येथे बुधवारी गेले होते. गुरुवारी त्या पाचजणांना कणकवलीत आणण्यात आले.
त्यांच्याजवळ पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पीटर इंग्लंड या शोरुममध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले.

या चोरी प्रकरणात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून ती राजापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर पीटर इंग्लंड शोरुममधील काही कपडेही या चोरट्यांकडे मिळाले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदीश बांगर करीत आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

Web Title:  Arrest of robbery, robbery incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.