अटकसत्र सुरूच; खेडमधून आणखी एक ताब्यात

By admin | Published: April 26, 2015 11:32 PM2015-04-26T23:32:56+5:302015-04-27T00:16:22+5:30

रघुवीर घाटातील हत्याकांड : नातेवाइकांनी मृतांना ओळखले

Arrests begin; Another possession from the village | अटकसत्र सुरूच; खेडमधून आणखी एक ताब्यात

अटकसत्र सुरूच; खेडमधून आणखी एक ताब्यात

Next

खेड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयाच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी तिघाही मृतांना ओळखले असून, सडलेल्या मृतदेहांचे नमुने तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.
लीलाबाई बापू सावंत (वय ४२), मनीषा बापू सावंत (१७), पूनम बापू सावंत (१२) यांचा खून करून त्यांचे मृतदेह रघुवीर घाटातील माकडकडी भागात टाकून दिल्याप्रकरणी अशोक धोंडिराम ढवळे (रा. शिरगाव पिंपळवाडी, ता़ खेड) आणि अविनाश शिंदे (रा. शिंदी, ता. महाबळेश्वर, जि़ सातारा) यांना पेण पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी नातेवाइकांनी तिन्ही मृतदेह ओळखले असून, याप्रकरणी आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सडलेल्या मृतदेहांचे नमुनेदेखील तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.
मायलेकींचे सडलेले मृतदेह पेण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या मृतदेहांचे विच्छेदन तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यावर ते मृतदेह खेड नगरपरिषदेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले आहेत. या तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रार दीपाली प्रशांत शिंदे (२३, रा. दिवा) यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपास करताना हे हत्याकांड उघड झाले. आरोपींनी तिघींना रघुवीर घाटात अज्ञातस्थळी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

सावंत यांचा मोबाईल आरोपीकडे
मृत लीलाबाई सावंत हिचा मोबाईल आरोपीकडे सापडल्यामुळेच आरोपीचा शोध लागल्याचा दावा पेण पोलिसांनी केला़ हत्याकांडप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबतचा तपास पेण पोलीस करीत असतानाच पोलिसांनी खेड तालुक्यातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Arrests begin; Another possession from the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.