वैभववाडीतील अरुणा मध्यम प्रकल्प ७५ टक्के भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:29 PM2019-08-01T12:29:33+5:302019-08-01T12:32:05+5:30
यंदाच्या वर्षी घळभरणी झालेला अरुणा प्रकल्प ७५.१३ टक्के भरला असून सध्या या धरणामध्ये ३५.0९00 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात २२२.६0 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २८७७.४0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प ६७.६२ टक्के भरला असून या धरणाच्या विद्युत विमोचकातून ६.00 घ.मी प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
सिंधुदुर्गनगरी : यंदाच्या वर्षी घळभरणी झालेला अरुणा प्रकल्प ७५.१३ टक्के भरला असून सध्या या धरणामध्ये ३५.0९00 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात २२२.६0 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २८७७.४0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प ६७.६२ टक्के भरला असून या धरणाच्या विद्युत विमोचकातून ६.00 घ.मी प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प ८६.११ टक्के भरला असून या धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. सध्या या धरणातून ३२५.८२ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १९४ मि.मी पाऊस झाला असून २७१९.८0 मि.मी एकूण पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत या धरणामध्ये ३८५.२१४0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या प्रकल्पामध्ये ३६0.६१00 द.ल.घ.मी इतका पाणीसाठा होता तसेच धरण ८0.६१ टक्के भरले होते. गेल्या वर्षीचा विचार करता यंदा धरणामध्ये जास्त पाणीसाठा झाला आहे.
१७ प्रकल्प १00 टक्के भरले
जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून जिल्ह्यातील १७ लघु पाटबंधारे प्रकल्प १00 टक्के भरले असून या सर्वच प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.