मुसळधार पावसामुळे करुळ घाटात संरक्षक कठडा खचला, मार्ग ठप्प; 'या'मार्गे वाहतूक वळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:59 AM2022-08-08T11:59:17+5:302022-08-08T12:12:46+5:30
तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असुन घाट परिसरात मुसळधार पाऊस आहे
प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): मुसळधार पावसामुळे काल, रविवारी रात्री करुळ घाटातील संरक्षक भिंत खचून भगदाड पडले आहे. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात झाली आहे. घाट खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने शेकडो वाहने अडकली होती. तर, या मार्गावरील वाहतूक भुईबावडा, फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली असून रात्रीपासून घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असुन घाट परिसरात मुसळधार पाऊस आहे. काल, रविवारी रात्री सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक भिंत खचली. भगदाड पडून तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत करुळ तपासणी नाक्यावर वाहनचालकाने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, उपनिरीक्षक सुरज पाटील, विलास राठोड, अभिजीत तावडे, नितीन खाडे आदी घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान पोलिसांना करुळ घाटमार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली आहे. वैभववाडीतील संभाजी चौकात बॅरिकेटस लावण्यात आली आहेत.