क्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:53 PM2019-05-13T12:53:39+5:302019-05-13T12:54:36+5:30

मालवण : क्षुल्लक कारणावरून महेश गोविंद मालंडकर (३५) रा. तोंडवळी तळाशिलवाडी यांना तेथीलच विश्वनाथ सोनदेव खवणेकर (६२) याने कोयत्याने ...

Attack on one | क्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला

क्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला

Next
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्लातोंडवळीतील घटना : एक जखमी; गुन्हा दाखल

मालवण : क्षुल्लक कारणावरून महेश गोविंद मालंडकर (३५) रा. तोंडवळी तळाशिलवाडी यांना तेथीलच विश्वनाथ सोनदेव खवणेकर (६२) याने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना काल रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्वनाथ खवणेकर याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विश्वनाथ खवणेकर यानेही महेश मालंडकर, हरी मालंडकर, नारायण मालंडकर या तिघांविरोधात थापटाने मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी-तोंडवळी तळाशिलवाडी येथे राहणारे महेश गोविंद मालंडकर यांच्याकडे विश्वनाथ खवणेकर यांचा मुंबईत वास्तव्यास असणारा चुलतभाऊ लक्ष्मण खवणेकर हा राहत असल्याच्या रागातून विश्वनाथ खवणेकर याने काल रात्री दारूच्या नशेत महेश मालंडकर यांच्या डोक्यावर, नाकावर व हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याला स्थानिक ग्रामस्थ व मित्रांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

महेश मालंडकर याने दिलेल्या तक्रारीनुसार विश्वनाथ खवणेकर याच्याविरोधात कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमी असलेल्या महेश मालंडकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गलोले हे करत आहेत.

तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

विश्वनाथ खवणेकर याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आपला चुलत भाऊ हा मुंबईवरून आल्यावर महेश मालंडकर यांच्याकडे राहतो. महेश मालंडकर हा आमच्या भावडांमध्ये भांडणे लावून देतो. काल रात्री महेश मालंडकर हा माझ्या घरासमोरच्या अंगणात उभे राहून टोमणे मारत होता. याबाबत विचारणा केली असता महेश मालंडकर, हरी मालंडकर, नारायण मालंडकर या तिघांनी आपल्याला हाताच्या थापटाने मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली असे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Attack on one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.