महिलेवर कोयत्याने हल्ला; भाड्याच्या घरात भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:23 PM2020-01-13T12:23:15+5:302020-01-13T12:25:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बांदा : इन्सुली-बिलेवाडी येथे एका खोलीत भाड्याने राहत असलेल्या बीड जिल्ह्यातील जोडप्याचे कडाक्याचे भांडण झाले. या ...

Attack on woman; Struggle with a rental home | महिलेवर कोयत्याने हल्ला; भाड्याच्या घरात भांडण

महिलेवर कोयत्याने हल्ला; भाड्याच्या घरात भांडण

Next
ठळक मुद्देमहिलेवर कोयत्याने हल्ला; भाड्याच्या घरात भांडणएकावर गुन्हा दाखल : इन्सुली-बिलेवाडी येथील घटना



लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : इन्सुली-बिलेवाडी येथे एका खोलीत भाड्याने राहत असलेल्या बीड जिल्ह्यातील जोडप्याचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. जखमी महिलेचे नाव लता तुळशीदास शिंदे (४२, बनावट नाव-शोभा तात्याराम साठे, रा. बीड) असे आहे. कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तात्याराम गोविंदराव साठे (४९, रा. काचरवाडी, ता. केज, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेयसीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्यावर विवाहित प्रियकराने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार प्रदीप रघुनाथ सावंत यांनी बांदा पोलिसांत दिली.
बीड जिल्ह्यातील तात्याराम साठे हा त्याच्यासोबत असलेली लता शिंदे ही आपली पत्नी असल्याचे सांगून तिचे नाव शोभा साठे असल्याचे सांगून इन्सुली-बिलेवाडी येते राहत होती. त्यामुळे दोघांना घरमालक चंद्रकांत हनुमंत सावंत यांनी भाड्याने खोली दिली होती. दोघेही हरिश्चंद्र तारी यांच्याकडे बांबू तोडणीचे काम करीत होते. संशयित आरोपी तात्याराम साठे याचे कुटुंब बीड येथे असून त्याच्या घरी पत्नी व दोन मुलगे आहेत. सिंधुदुर्गात कामाला जातो असे घरी सांगून प्रेयसी लताला घेऊन तो इन्सुलीत भाड्याने राहत होता. शुक्रवारी सकाळी दोघेजण बीडला जाणार होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास लता हिने आपल्या बीड येथील मित्राला फोन करून मी गावी येत असून, बीड शहरात भाड्याच्या खोलीत राहणार आहे. त्यानंतर तात्याराम पंधरा दिवसांसाठी आपल्या घरी जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत तू आपल्या सोबतीला ये. आपण मजा करू या, असा फोन केला.
तात्यारामने फोनवरील हा संवाद लपून ऐकला व त्यानंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित तात्यारामला ताब्यात घेतले. यावेळी तो देत असलेल्या माहितीमध्ये विसंगती होती. लता ही आपली प्रेयसी असून तिचे बनावट नाव दिल्याचेही त्याने पोलिसांकडे मान्य केले. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तात्यारामवर बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकाँस्टेबल पी. एस. पवार करीत आहेत.

गंभीर जखमी रक्ताच्या थारोळ्यात; उपचार सुरू
आपल्याला फसवून जुन्या मित्राला फोन केल्याचा राग मनात ठेवून तात्यारामने लताच्या मान व कपाळावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्याचवेळी शेतात कामासाठी जात असलेल्या प्रदीप सावंत यांना लता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती हरिश्चंद्र तारी, अमित सावंत, संतोष मांजरेकर, तानाजी सावंत यांना दिली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तात्यारामला ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. जखमी लता शिंदे यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.

Web Title: Attack on woman; Struggle with a rental home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.