बांदा ग्रामपंचायतीच्या कारभारावर हल्लाबोल

By admin | Published: July 20, 2016 11:23 PM2016-07-20T23:23:41+5:302016-07-21T00:54:21+5:30

श्रीकृष्ण काणेकर यांची टीका : कचराकुंडी खरेदीत भ्रष्टाचार ; सीईओंना भेटणार

Attack on the work of Banda Gram Panchayat | बांदा ग्रामपंचायतीच्या कारभारावर हल्लाबोल

बांदा ग्रामपंचायतीच्या कारभारावर हल्लाबोल

Next

बांदा : ग्रामपंचायतीच्या कचराकुंडी खरेदीत ९0 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून बांदा ग्रामपंचायतीत बेनामी ठेकेदारी वाढली आहे. शहरातील कामे निकृष्ट दर्जाची व बोगस केली जात आहेत. केवळ भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ‘मिलकर खाए’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा कारभाराची विशेष पथकाकडून लेखापरिक्षण केल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर यांनी दिली. बांदा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत व सत्ताधाऱ्यांवर चौफेर टिका केली.
बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेतून ग्रामपंचायतीने ४९ सार्वजनिक कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. अ‍ॅरिस्टो प्लास्ट या कंपनीच्या कचरा कुंड्या या ४२७४ रुपये प्रति कचरा कुंडी या दराने खरेदी केल्या आहेत. याची कागदोपत्री माहिती आपण मिळविली असून याचा दर प्रति कुंडी २२४१ रुपये आहे. त्यामुळे कचरा कुंडी खरेदीत ९0 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप काणेकर यांनी केला. यामुळे गेल्या २ वर्षातील सीएफएल बल्ब खरेदी व १५ टक्के मागासवर्गीय निधीतून खरेदी केलेल्या वस्तुंबाबत संशयास्पद कारभार असून त्याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
मच्छीमार्केट येथे सीआरझेडचा नियम असतानाही भाजी मार्केट बांंधण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. यासाठी लोकवर्गणीसाठी ५ लाख ४0 हजार रुपये नाहक भरण्यात आले आहेत. हे पैसे अडकून पडले आहेत. तर उभाबाजार येथील गटाराचे बांधकाम निकृष्ट काम पहिल्याच पावसात उघड झाले आहे. जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या फायबरची स्वच्छतागृहे विनावापर पडून आहेत. सत्ताधारी केवळ घोषणा करतात, मात्र शहरात भौतिक सुविधांची वानवा आहे. वस्तू खरेदीसाठी राबविण्यात येणारी ई-टेडरिंग सुविधा ही भ्रष्टाचारासाठी कुरण असल्याचे बांदा ग्रामपंचायतीत सिध्द झाले आहे. विशेष लेखापरिक्षकांकरवी ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण केल्यास अनेक आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे. लवकरच ग्रामपंचायतीतील सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे काणेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा आव आणत आहेत. मात्र पोलिस स्थानकातील नळपाणी पाईपलाईन, आळवाडी येथील उद्यान, तीन तुळशीकडील ओहोळावरील पूल, बांदेश्वर मंदिरकडील मोठ्या गटाराची सफाई आपण आपल्या कारकिर्दित केली आहे, असे यावेळी काणेकर यांनी सांगितले. तर पारदर्शक कारभार करा व जनतेचा विश्वास मिळवा, असा सल्लाही काणेकर यांनी यावेळी
दिला. (प्रतिनिधी)

आपल्या कारकीर्दीतील व्यवहार पारदर्शी
आपण सरपंच असतानाचे सर्व व्यवहार हे पारदर्शक होते. हिंमत असेल तर आपल्या कारकीर्र्दीतील घोटाळे उघड करुन दाखवावेत, असे आव्हानही काणेकर यांनी यावेळी दिले.
सरपंचांचे फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
दिपक केसरकर हे आमदार असताना बांद्यात क्रीडानगरीचे आश्वासन मी सरपंच असताना आपणास दिले होते. त्यामुुळे हे क्रीडा संकुल आपण मंजूर करुन आणल्याचा सरपंचांचा दावा खोटा आहे. कोणतीही कामे न करता केवळ फुकाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Attack on the work of Banda Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.