सावंतवाडीचे उदयोजक अमेय तेंडुलकरांना "ब्लॅकमेल" करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:59 AM2019-07-17T11:59:33+5:302019-07-17T12:05:23+5:30

सावंतवाडी येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमेय प्रभू- तेंडोलकर यांना रायगड पेण येथे "ब्लॅकमेल"करण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी तेंडोलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना काल उशिरा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली.

An attempt to "blackmail" the successor of Sawantwadi Ameya Tendulkar | सावंतवाडीचे उदयोजक अमेय तेंडुलकरांना "ब्लॅकमेल" करण्याचा प्रयत्न

सावंतवाडीचे उदयोजक अमेय तेंडुलकरांना "ब्लॅकमेल" करण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसावंतवाडीचे उदयोजक अमेय तेंडुलकरांना "ब्लॅकमेल" करण्याचा प्रयत्नदोघांना अटक: ३२ लाखाची मागितली होती खंडणी

सावंतवाडी : येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमेय प्रभू- तेंडोलकर यांना रायगड पेण येथे "ब्लॅकमेल"करण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी तेंडोलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.दरम्यान त्यांना काल उशिरा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली.

ही घटना काल घडली.यशवंत पाटील व जगदीश म्हात्रे दोन्ही रा.पेण यांनी तेंडोलकर यांना ब्लॅकमेल केले.त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखाची खंडणी मागितली होती. तेंडोलकर यांच्याकडे डोलवी येथे जे.एस.डब्ल्यू कंपनीत काम करण्याचे कंत्राट आहे.त्या ठिकाणी ते काम करत असताना,तू बाहेरचा ठेकेदार आहेस.

आमच्या परवानगीशिवाय येथे काम करायचे नाही.तशी कुणाला परवानगी नाही.तुझे कंत्राट रद्दकर,तू आणलेल्या मशीन कंपनीतून बाहेर काढ अशी दमदाटी केली.तसेच येथे काम करायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल असे सांगून ३२ लाख ५० हजाराची मागणी केली. याप्रकरणी तेंडोलकर यांनी तक्रार केल्यानंतर वडखळ पोलिसांनी या दोघांना अटक केली असून भादवि कलम ३८४,३८७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An attempt to "blackmail" the successor of Sawantwadi Ameya Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.