सावडाव धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न  : अधिकाºयांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:52 PM2018-11-21T14:52:01+5:302018-11-21T14:52:07+5:30

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा बारा महिने प्रवाहित ठेवणे तसेच पर्यटकांना सुविधा पुरविणे आणि धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे ...

Attempt to develop Savadaw waterfall tourism: Attend officers' survey | सावडाव धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न  : अधिकाºयांची पाहणी

सावडाव धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न  : अधिकाºयांची पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देएमटीडीसी, टाटा उद्योग समूह प्रयत्न करणार 

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा बारा महिने प्रवाहित ठेवणे तसेच पर्यटकांना सुविधा पुरविणे आणि धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे यासाठी एमटीडीसी व टाटा उद्योग समूह यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंगळवारी संबंधित अधिकाºयांनी सावडाव धबधब्याची   पाहणी केली. 

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सावडाव धबधबा विकसित करण्याची मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यामुळे  त्यांच्या सुचनेनुसार टाटा उद्योग समूह आणि एमटीडीसीच्या अधिकाºयांनी सावडाव धबधबा परिसर पाहणी दौरा मंगळवारी  केला .

यावेळी सावडाव धबधबा बारा महिने प्रवाहित ठेवणे, पर्यटकांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था, जंगल सफारी, वनौषधी प्रदर्शन, दुर्मीळ पक्षी दर्शन, ट्रॅकिंग पॉर्इंट यासह स्थानिकांना रोजगार कसा देता येईल याबाबत पाहणी करून चर्चा करण्यात आली.

यावेळी टाटा समूहाचे अधिकारी योगेश जोशी, एमटीडीसीचे अधिकारी पृथ्वीराज जाधव, नितीन वाळके, कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, शिवसेना विभागप्रमुख अरविंद राणे, उपविभागप्रमुख व्यंकटेश वारंग, शाखाप्रमुख विजय डगरे, बाळा वारंग, विष्णू दुखंडे, अविनाश गिरकर आदी उपस्थित होते.

 

सावडाव धबधब्याची पाहणी मंगळवारी एमटीडीसीच्या अधिकाºयांनी केली. यावेळी टाटा समूहाचे अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Attempt to develop Savadaw waterfall tourism: Attend officers' survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.