जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 PM2021-03-20T16:14:43+5:302021-03-20T16:18:48+5:30

women and child development Zp Sindhudurg-जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.

Attempt to make children in the district malnutrition free: Mhapsekar | जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर

तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, अजिंक्य पाताडे, जे. पी. जाधव, संजना सावंत उपस्थित होते. (छाया : मनोज वारंग )

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर तोंडवळी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

ओरोस : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.

जिल्हा परिषद शेष फंडातून जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शुक्रवारी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील साईसागर रिसॉर्टमध्ये झाले. याचे उद्घाटन अध्यक्ष म्हापसेकर यांच्याहस्ते करण्यात आले.

आयुष्यात प्रशिक्षण महत्त्वाचे असते. प्रशिक्षणातून ज्ञान मिळते, समाजाच्या विकासाची माहिती मिळते. त्यातून विकास करणे सोपे जाते, असे सांगतानाच, जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून घेतला पाहिजे, असेही म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सरपंच आबा कांदळकर आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांनी, ग्रामीण विकास, बांबू लागवड व जलजीवन मिशन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, संजना सावंत, उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, मनस्वी घारे, सावी लोके, शर्वाणी गावकर, श्रिया सावंत, समिधा नाईक, मानसी जाधव, संजय देसाई, अनघा राणे, जेरॉन फर्नांडिस, रवींद्र जठार, विष्णुदास कुबल, गणेश राणे, मालवण पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर, गायत्री ठाकुर, विनोद आळवे, अशोक बागवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ५० जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचा एकही सदस्य आलेला नाही. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही, असेही राजेंद्र म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले. 

पाटील, देवधरांचे मार्गदर्शन

यावेळी जिल्ह्यातील स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा या विषयावर प्रशिक्षण देताना मिलिंद पाटील यांनी, बांबू लागवडीला १९९५ पासून प्राधान्य सुरू झाले आहे. या लागवडीत कमी मेहनतीत जास्त आर्थिक लाभ मिळतो. जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, असे सांगत माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी, राजकीय लोकांनी काम करताना सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रित करून विकास साधण्यासाठी धोरण बदलले पाहिजे, असे आवाहन केले.

 

 

Web Title: Attempt to make children in the district malnutrition free: Mhapsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.