अवधेश यादव ‘प्रमोद पाटील श्री’

By admin | Published: February 4, 2015 11:42 PM2015-02-04T23:42:38+5:302015-02-04T23:58:55+5:30

कुरुंदवाडात शरीरसौष्ठव स्पर्धा : १५० स्पर्धकांनी घेतला सहभाग

Awadhesh Yadav 'Pramod Patil Shree' | अवधेश यादव ‘प्रमोद पाटील श्री’

अवधेश यादव ‘प्रमोद पाटील श्री’

Next

कुरुंदवाड : इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅन्ड फिटनेस फेडरेशन आणि छत्रपती ग्रुप शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एस. पी. हायस्कूलच्या मैदानावर मंगळवारी (दि. ३) शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतून सुमारे १५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत ‘प्रमोद पाटील श्री २०१५’चा अवधेश यादव (महाराष्ट्र) हा मानकरी ठरला. रोख २५ हजार रुपये व मानचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील व छत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत बेस्ट पोझर म्हणून संग्राम सावंत, मोस्ट इम्प्रूह अजिंक्य रेडेकर यांना मान मिळाला. अन्य निकाल पुढीलप्रमाणे - खुला गट अनुक्रमे प्रथम - अविनाश इंगळे, द्वितीय - रोहित शेट्टी, तृतीय - दुर्गाप्रसाद दासरी, चतुर्थ - गॉडवीन मेंगलेस, पाचवा - प्रवीण निकम. ८० ते ८५ किलो वजनीगट अनुक्रमे - सुनीत दांगट, विशाल कांबळे, मेनन केरीवाला व पुंडलिक सादगीर, ७५ ते ८० किलो - अजिंक्य रेडेकर, योगीराज शिंगे, महेश जाधव, लिलाधर माने, संतोष खेडेकर. ७० ते ७५ किलो - प्रवीण म्हात्रे, विशाल चौगुले, रियाज पठाण, रितेश भडंगे, गणेश पाटील. ६५ ते ७० किलो - अक्षय देवके, गोमटेश बल्लाप्पा, विश्वनाथ कालन, संतोष थोरात, मंगेश म्हात्रे, ६० ते ६५ किलो - कुरहान सय्यद, विजय कुंभार, सतीश कुशालकर, बाबू आष्टेकर, ख्रिस्तोफर गौजालीन, ५५ ते ६० किलो - रोशन तटकरे, मोहम्मद कोठारी, विजय शिंदे, रोेहित पवार, सरदार माळी. स्पर्धा ५५ ते ८० किलो अशा सात वजनी गटांत झाल्या. यावेळी आमदार उल्हास पाटील, रामचंद्र डांगे, दलितमित्र अशोकराव माने, दशरथ काळे, अभिजित जगदाळे, मधुकर पाटील, सीमा पाटील उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप पवार, सुशांत कांबळे, दयानंद खानोरे यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)

Web Title: Awadhesh Yadav 'Pramod Patil Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.