बाबा वर्दम, अक्षरसिंधु कलामंचला प्रथम क्रमांक
By admin | Published: January 1, 2016 11:20 PM2016-01-01T23:20:15+5:302016-01-02T08:29:28+5:30
नाथ पै एकांकिका स्पर्धा : आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने कणकवली येथे आयोजन
कणकवली : येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सची ‘अॅक्ट’ एकांकिका तर शालेय गटातून कणकवली येथील अक्षरसिंधु साहित्य कलामंचची ‘प्लॉट नं. शून्य, कचराकुंडी जवळ’ ही एकांकिका पहिली आली आहे.नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेचे परिक्षक भालचंद्र कुबल, विजय नाईक, नीलकंठ कदम यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते विजेत्यांच्या गौरव करण्यात आला.या एकांकिका स्पर्धेतील खुल्या गटातून ‘आरर्टीफिशिअल इंटेलीजन्स’-(अक्षरसिंधु, कणकवली) ही द्वितीय, तर ‘१० वाजून १० मिनिटे’ (समर्थ कलाविष्कार ग्रुप, देवगड) यांची एकांकिका तृतीय आली आहे. दिग्दर्शनासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे अमित देसाई - अॅक्ट (बाबा वर्दम कुडाळ), स्वानंद देसाई - क्रॉर्निक डार्क (द ग्रेट मराठा थिएटर्स, रत्नागिरी), सिद्धार्र्थ साळवी - सायलेंन्ट स्क्रीम (कलाअंकुर मालवण). तांत्रिक अंगे - अनुक्रमे तीन क्रमांक - बुरगुंडा - चंद्रभागा थिएटर्स कणकवली, माणूस माझा गाव-महाशाळा कलासंगम गोवा, सायलेन्ट स्क्रीम कलाअंकुर मालवण. अभिनय - पुरूष अनुुक्रमे तीन क्रमांक भूमिका पीयुष - नीलेश पवार (आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स), बाबा-सागर माने (मुक्तीधाम - हेरंब नाट्यग्रुप दापोली), राजेंद्र - राजेंद्र बोडेकर (१० वाजून १० मिनिटे). अभिनय मुली अनुक्रमे तीन क्रमांक मुलगी-तन्वी मुडंले (अॅक्ट), मुक्ता - शुभदा पवार (सायलेंन्ट स्क्रीम), सोनल - सोनल उतेकर - (१० वाजून १० मिनिटे). उत्तेजनार्थ - सौरभ कुलकर्णी (क्रोर्निक डार्क), अनंत लवंदे (माणुस माझे गाव), अन्वी वैद्य (मुक्तीधाम),ऐश्वर्या साठे (क्रोर्निक डार्क). कै. मामा वर्रेकर स्मृती लेखन पुरस्कार - योगसिद्धार्थ पराडकर, अभिषेक कोयंडे (१० वाजून १० मिनिटे).
शालेय गट - सांघिक द्वितीय, झेप (बहुरूपी कलामंच कोल्हापूर), रेस : २ (सेक्रेड आर्टस स्कूल कल्याण). दिग्दर्शन अनुक्रमे सुहास वरूणकर-प्लॉट नं शून्य (अक्षरसिंधु), ललिता शिंदे- झेप (बहुरूपी कलामंच कोल्हापूर), सुरेश शेलार - रेस : २ (सेक्रेड आर्टस स्कूल कल्याण).तांत्रिक अंगे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक- झुळुक (शिरगाव हायस्कूल), प्लॉट नं शून्य (अक्षरसिंधु), झेप (बहुरुपी कलामंच कोल्हापूर). अभिनय मुलगे -अनुक्रमे भूमिका सावकार - हेरंब देशपांडे (सावकाराची व्हान-आरतीप्रभूू कला अकॅडमी कुडाळ), मुलगा, चोर, अनाऊन्सर - जयराज कुडाळकर (सावकाराची व्हान), कचऱ्या - राज बाने (प्लॉट नं शून्य, अक्षरसिंधु). अभिनय मुली - भूमिका झुंबी - श्रेया दुधगावकर (झाडवाली झुंबी, शिंदे अकॅडमी कोल्हापूर), पिल्लू - सुमुखी टेंबे (झेप, बाबा वर्दम) माकडीन - सई कांबळे (रेस २ कल्याण), उत्तेजनार्थ - ऋग्वेद भोईर (रेस २), श्रेयस बागवे (तमसोमा जोर्तिमय) अवंतिका कवढेकर (झुंबी) यशश्री माळी (प्लॉट नं. शून्य) यांनी यश मिळविले आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे. यापुढेही जिल्हा बँकेचे कला क्षेत्रासाठी योगदान असेच राहील, असे सतीश सावंत यांनी सांगितले. परिक्षक भालचंद्र कुबल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वामन पंडीत व सूत्रसंचालन शरद सावंत यांनी
केले. (वार्ताहर)