सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन 

By अनंत खं.जाधव | Published: July 18, 2024 04:55 PM2024-07-18T16:55:58+5:302024-07-18T16:57:01+5:30

आमदार केसरकर यांच्या वाढदिनी गेल्यावर्षी केले होते आंदोलन, अद्याप हीच परिस्थिती

Bad condition of Sawantwadi bus stand, bell ringing movement on behalf of Mahavikas Aghadi | सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन 

सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन 

सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे सरकारचे पूर्णता दुर्लक्ष सुरू असून सरकार दरबारी प्रवाशांची भावना पोचावी म्हणून आज, गुरूवारी महाविकास आघाडीच्यावतीने बसस्थानकावर घंटानाद आंदोलन छेडले. मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना प्रवाशांच्या भावना कळाव्यात म्हणून हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. एसटी प्रवाशांना अशी वागणूक मिळत असेल तर नवनवीन योजना कशासाठी असा सवाल यावेळी करण्यात आला.  

साळगावकर म्हणाले, बस स्थानक दुरावस्थेबाबत आमदार केसरकर यांच्या वाढदिनी गेल्यावर्षी आंदोलन केलं होते. तेव्हा कुणाच्या वाढदिनी आंदोलन करू नये अशी आमची कुच्छीतपणे चेष्टा केली होती. मात्र, वर्षभरात इथली परिस्थिती काही बदलेली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना जाग यावी, प्रवाशांच्या वेदना कळाव्यात यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. परिस्थिती बदलत नसल्यानं आमदार बदलायचाय असेही साळगावकर यांनी सांगितले.
गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यातील एकही मंत्री जनतेची कामं करू शकला नाही. हे सरकार निष्क्रिय सरकार म्हणूनच ओळखले जात आहे. स्वतःची तुंबडी भराण्यासाठी मंत्री काम करत आहेत असा टोला जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्र्यांना साळगावकर यांनी लगावला.

राऊळ म्हणाले, भुमिपूजन होऊन सात वर्षे उलटून गेली हे बसस्थानक विकसीत झाले नाही. विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिला आहे. त्यामुळे येणारा आमदार हा इंडिया आघाडीचा असेल, प्रत्येक पक्षाला मागणी करण्याचा अधिकार आहे. दरम्यान, पोलिसांकडून नोटीसा देऊन हे शांततेत सुरू असणारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यानं यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात उध्दव सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका पुंडलिक दळवी, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, बाळा गावडे,  देवेंद्र टेमकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, शिवदत्त घोगळे, सावली पाटकर, सायली दुभाषी, रश्मी माळवदे, अफरोज राजगुरू आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bad condition of Sawantwadi bus stand, bell ringing movement on behalf of Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.