Chipi Airport Inauguration: केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचा परिणाम नाही, महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करणार: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:41 AM2021-10-10T11:41:01+5:302021-10-10T11:42:09+5:30
Chipi Airport: पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू, यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
अनंत जाधव
सावंतवाडी : केंद्र सरकार लोकांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या संस्थाचा गौरवापर करत आहे. त्यांचा सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय वापर होत आहे. पण यांचा आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही आम्ही त्यांना निश्चीत सहकार्य करत राहू आणि पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat) व्यक्त केला. चिपी येथील विमानतळ उद्घाटन (Chipi Airport Inauguration) कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधत अनेक विषयावर आपली मते माडली.यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न कसा लवकर मार्गी लागेल या दृष्टीने माझा प्रयत्न राहिल असे ही स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, गेले काहि दिवस आमच्या मंत्री आमदार यांना त्रास देण्या चा प्रयत्न केंद्रातील वेगवेगळ्या एजन्सीकडून सुरू आहे.ज्या लोकांच्या रक्षणासाठी आहेत त्याचा वापर केला जात आहे.पण यातून निषपन्न काहि होणार नाही पण ते त्रास देत आहेत.त्यांना तो देत राहूदे आम्ही आमचे काम करत राहणार आमच्या सरकारला कोणताही धोका नाही दोन वर्षे झाली आणखी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू असा विश्वास थोरात यांनी व्यकत केला.
महाविकास आघाडी सरकावर दबाव आणण्याचा जरी हा प्रकार असला तरी आमचे मंत्री आमदार एकसंघ आहेत.त्यामुळे आम्हाला त्रास देउन काय साध्य होणार नाही आणि सिध्द ही होणार नाही नसल्याचे थोरात यांनी सांगितले.काँग्रेसने जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणूूकीत चांगली कामगिरी केली असून,भविष्यात ही अशी कामगिरी होईल कार्यकर्त्यांनी आता जोमाने काम करावे असे आवाहन थोरात यांंनी केले आहे.
आंबोली चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न मी समजावून घेईन मागील सरकार च्या कार्यकाळात काय झाले हे मला माहीत नाही पण आता यात नव्याने लक्ष घालून तो सोडवला जाईल त्यासाठी लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयाचा ही दौरा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले मागील काहि दिवसात कोरोना तसेच चक्रीवादळ आदि संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात आलो नाही पण पुढच्या काळात नक्की येणार असल्याचा विश्वास ही थोरात यांनी दिला.
जिल्हा बँक महाविकास आघाडीकडून लढणार
जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढली जाईल यात कोणतीही शंका नाही.आमचे जास्ती जास्त उमेदवार निवडून येतील स्थानिक पातळीवर त्यांचे काम ही सुरू झाले असून,आम्ही कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या संर्पकात असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.