बालनाट्य चळवळ सक्षम व्हावी : दीपक भावे
By admin | Published: April 16, 2015 09:20 PM2015-04-16T21:20:47+5:302015-04-17T00:20:30+5:30
कलाकारांसाठी लवकरच कोकणात मार्गदर्शन शिबिर
कोकणातील विशेषत: सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे पडद्यावर आणण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनय क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगत अभिनयाचा गाभा ओळखून कथानकाशी समरुप होऊन काम केल्यास नक्कीच या क्षेत्रात संधी असल्याचे त्यांनी सांगितले.लवकरच कोकणात याबाबत कलाकारांसाठी मार्गदर्शन शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बालनाट्य चळवळ सक्षम नसल्याने मराठी रंगभूमीची दुरवस्था झाली आहे. भविष्यात दर्जेदार व कसलेले कलावंत निर्माण होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ हा विषय सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत सिने दिग्दर्शक दीपक भावे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘रात्रीचो राजा’ या व्यावसायिक मालवणी नाटकाच्या निमित्ताने ते बांदा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
कोकणातील मुलांमध्ये असलेली गुणवत्ता लक्षात घेता त्यांना मराठी रंगभूमीची अपेक्षित संधी मिळावी, यासाठी कोकणातील कलाकारांसाठी कला व्यावसायिकतेवर आधारित शिबिर गरजेचे आहे. तसेच कोकणातील महाविद्यालयांमधून नाट्य, एकांकिका स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. दीपक भावे यांनी आतापर्यंत हिंदी तसेच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
२00५ मध्ये त्यांनी दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यासोबत सुपरहिट ठरलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरसोबत ‘फॅशन’, ‘जेल’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘हिरोईन’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. मधुर भांडारकरसोबत त्यांचा ‘कॅलेंडर गर्ल्स’ हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रंगभूमीवर येत आहे.
मराठीत त्यांनी ‘नांदी’, ‘ईश्वरी’, ‘चिंतामणी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कोकणातील दशावतारावर आधारित ‘रात्रीचो राजा’ या मालवणी बोलीभाषेतील नाटकाचे ते प्रथमच दिग्दर्शन करीत आहेत. कोकणात कलाकारांची खाण आहे. मात्र, याठिकाणी अद्ययावत थिएटर्स नसल्याने या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. यासाठी येथील कलाकारांनी संधी मिळावी, यासाठी कोकणातच ‘रात्रीचो राजा’ या व्यावसाियक नाटकाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘रात्रीचो राजा’ हे नाटक दशावतारी कलेतील राजाची भूमिका साकारणाऱ्या बाबी गावडे या पात्राची आहे. कोकणातील दहिकाल्यात रात्रीच्या राजाची भूमिका करणाऱ्या या कलाकाराचे आयुष्य मात्र उपेक्षितच आहे. सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत असताना त्याच्या कुटुंबीयांना भोगावे लागणारे भोग या नाटकातून मांडण्यात आले आहेत. कोकणातील लोककलेवर आधारित या नाटकाची निर्मिती असल्याने कोकणातील प्रेक्षकांना हे नाटक नक्कीच भावणार आहे. आपण आतापर्यंत विविध दिग्दर्शक, निर्माते यांचेबरोबरच केलेल्या कामाचा अनुभव आपल्या रंगभूमीवरील प्रवासात मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोकणातील युवा कलाकारांत प्रचंड बुद्धिमत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शक नसल्याने कोकणातील युवा कलाकारांना अपेक्षित संधी रंगभूमीवर मिळत नाही. याची खंत असल्याने येथील युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
नीलेश मोरजकर ल्ल बांदा

नीलेश मोरजकर - बांदा