फेन्सिंग स्पर्धेत बालशिवाजी इंग्लिश स्कूलला सांघिक विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 10:47 AM2019-10-03T10:47:39+5:302019-10-03T10:51:14+5:30
कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग अससोसिएशन ...
कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग अससोसिएशन , विद्यामंदिर हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय फेन्सिंग (तलवारबाजी ) स्पर्धेत बालशिवाजी इंग्लिश स्कूलने सांघिक विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत सरवदे यांच्या हस्ते झाले . यावेळी पर्यवेक्षक पिराजी कांबळे, क्रीडा शिक्षक अच्युत वणवे, सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, पंच अक्षय कुलकर्णी, अंकुर जाधव, रेखा धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
१४ वर्षाखालील मुले (फॉईल ) -प्रथम- राजकुमार जाधव (बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल), द्वितीय -रुद्रेश पडते (सेंट उर्सुला स्कूल), तृतीय - महादेव सावंत, पार्थ कोरडे (बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल ).
(ईपी ) प्रथम - कुणाल नारकर, द्वितीय - रत्नेश जातेकर( दोन्ही बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल) . तृतीय - रुद्रेश पडते (सेंट उर्सुला स्कूल), स्वानंद पारकर (विद्यामंदिर हायस्कूल ).
(सेबर ) प्रथम - वेद गणपत्ये,द्वितीय - कुणाल नारकर, तृतीय -काव्य महाडेश्वर, रत्नेश जातेकर (सर्व बालशिवाजी इंग्लिश स्कूल).
१४ वर्षांखालील मुली -
(फॉईल ) प्रथम - प्रीती दळवी, द्वितीय -चैतन्या तावडे, तृतीय - यशिका महाडेश्वर, सोनिया ढेकणे (सर्व बालशिवाजी इंग्लिश स्कूल).
(ईपी ) प्रथम - ऋतुजा शिरवलकर, द्वितीय - प्रीती दळवी, तृतीय - आरोही ठाकूर, सोनिया ढेकणे (सर्व बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल) . ( सेबर ) प्रथम -आरोही ठाकूर, द्वितीय - चैतन्या तावडे , तृतीय -संहिता अंधारी, ऋचा प्रधान (सर्व बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल) .
१७ वर्षाखालील मुले (फॉईल ) प्रथम -प्रथमेश घाडी, द्वितीय -दीप दळवी (दोन्ही बालशिवाजी इंग्लिश स्कूल) , तृतीय -जयेश पेडणेकर (विद्यामंदिर हायस्कूल), आर्य सुधीर राणे (बालशिवाजी इंग्लिश स्कूल) . (ईपी )प्रथम - अनिकेत साळुंखे (बालशिवाजी इंग्लिश स्कूल). द्वितीय - यशराज मिठारी (कळसुली इंग्लिश स्कूल), तृतीय -ओंकार गावडे (विद्यामंदिर हायस्कूल), आर्यन महाडिक (बालशिवाजी इंग्लिश स्कूल).( सेबर ) प्रथम -अनिकेत साळूंखे , द्वितीय -चिराग सावंत (दोन्ही बालशिवाजी इंग्लिश मेडीयम स्कूल), तृतीय श्रेयस सरवदे (विद्यामंदिर हायस्कूल), प्रथमेश घाडी( बालशिवाजी इंग्लिश स्कूल).
१७ वर्षाखालील मुली (फॉईल ) प्रथम -सिद्धी आरोलकर (बालशिवाजी इंग्लिश स्कूल ), द्वितीय -सृष्टी सावंत ( विद्यामंदिर हायस्कूल) , तृतीय अनिशा पाडावे (कळसुली इंग्लिश स्कूल), मीनल पालेकर (बालशिवाजी इंग्लिश स्कूल). (ईपी ) प्रथम -साक्षी चव्हाण,द्वितीय सोनिया ठाकूर (दोन्ही विद्यामंदिर हायस्कूल कणकवली) , तृतीय -अनिशा ताटे(बालशिवाजी इंग्लिश स्कूल), तेजस्वी परब (कळसुली इंग्लिश स्कूल). (सेबर ) प्रथम -वैष्णवी सरवदे (विद्यामंदिर हायस्कूल ), द्वितीय - सलोनी मोरे (बालशिवाजी इंग्लिश मेडियम स्कुल ). तृतीय अर्चा प्रभुदेसाई (बालशिवाजी इंग्लिश स्कूल), तन्वी गायकवाड -(विद्यामंदिर हायस्कूल).
१९ वर्षाखालील मुले (फॉईल ) प्रथम -योगेश सुद्रिक (ज्यू. कॉलेज कळसुली), ( ईपी) प्रथम - दिगंबर गावडे (ज्यू. कॉलेज कळसुली).
१९ वर्षाखालील मुली (फॉईल ) प्रथम - दीप्ती सुतार. (ईपी ) प्रथम -भावना ठाकूर( एस. एम. हायस्कूल कणकवली), द्वितीय -दीप्ती सुतार (ज्यू. कॉलेज कळसुली), तृतीय - स्नेहल घाडीगावकर (ज्यू. कॉलेज कळसुली). (सेबर )- प्रथम - स्नेहल घाडीगावकर (ज्यू. कॉलेज कळसुली) द्वितीय - भावना ठाकूर (एस. एम. हायस्कूल कणकवली)
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय शालेय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, रोहिणी मोकाशी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.