आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टर उपलब्ध होणार, वैभव नाईक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:40 PM2020-06-27T16:40:15+5:302020-06-27T16:41:55+5:30

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

B.A.M.S. Doctor will be available, Vaibhav Naik informed | आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टर उपलब्ध होणार, वैभव नाईक यांची माहिती

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

Next
ठळक मुद्दे आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टर उपलब्ध होणार, वैभव नाईक यांची माहिती आर्सेनिक अल्बम ३0 गोळ्या वाटपाचा कळसुली येथे शुभारंभ

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ बी.ए.एम.एस. डॉक्टरांची पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याअंतर्गत ३६ डॉक्टरांची भरती झाली असून उर्वरित पदे लवकरात लवकर भरली जातील. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठीही बी.ए. एम.एस. डॉक्टर उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय मेडिकल महाविद्यालयाची निर्मिती ओरोस येथे केली जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यांचा डोस असलेल्या ह्यआर्सेनिक अल्बम ३०ह्ण या गोळ्या वाटपाचा कणकवली तालुक्याचा शुभारंभ कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार नाईक यांच्या उपस्थितीत झाला. प्रथमत: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ म्हणाले, तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण २८ लाख आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्याचे वितरण सुरु झाले असल्याचे ते म्हणाले.

संदेश पारकर म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रयोगशाळा देऊन दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख राजू राणे, बाळा भिसे, भास्कर राणे, अरविंद दळवी, रुपेश आमडोस्कर, राजू राठोड, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब, अतुल दळवी, मधुकर चव्हाण, दिनकर दळवी, सहदेव नाईक, ललित घाडीगावकर, हरी गावकर, गणेश पाडावे, संतोष मसुरकर, मिथिल दळवी आदी उपस्थित होते.

२८ लाख गोळ्या उपलब्ध

सिंधुदुर्गात कोविड- १९ व इतर रोगांचे निदान करणारी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सरकारच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० या २८ लाख गोळ्या कणकवली तालुक्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

जनतेने लाभ घ्यावा

या गोळ्या प्रत्येक घराघरातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्याचा लाभ जनतेने घ्यावा, तसेच निरोगी रहावे, असे आवाहन यावेळी वैभव नाईक यांनी केले. आगामी काळात जनतेचे आरोग्य उत्तमरित्या राखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत.



 

Web Title: B.A.M.S. Doctor will be available, Vaibhav Naik informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.