बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 01:13 PM2021-12-21T13:13:18+5:302021-12-21T13:14:08+5:30

केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

Banda Gram Panchayat By Election Short response to voting in the morning session | बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

Next

बांदा : शहर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानासाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात केवळ ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये एकूण ६९४ मतदार आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. मात्र थंडीचा कडाका असल्याने पहिल्या दोन सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात ७० मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेना व भाजपने बूथ उभारले आहेत. याठिकाणी भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Banda Gram Panchayat By Election Short response to voting in the morning session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.