बांदा ग्रामस्थांचाही मायनिंगला विरोध

By admin | Published: December 10, 2015 12:45 AM2015-12-10T00:45:38+5:302015-12-10T00:47:48+5:30

ग्रामसभेत निर्णय : अन्य विषयांवरही चर्चा, जानेवारीत विशेष सभा होणार

Banda villagers also oppose mining | बांदा ग्रामस्थांचाही मायनिंगला विरोध

बांदा ग्रामस्थांचाही मायनिंगला विरोध

Next

बांदा : झपाट्याने विकसीत होत असलेल्या व बांदा शहराच्या मुळावर येणाऱ्या प्रस्तावित खनिज प्रकल्पाला बांदा ग्रामसभेत देखिल विरोधाची भूमिका घेण्यात आली. बुधवारी घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत मायनिंगविरोधी ठराव घेत यासंदर्भात बांदावासियांची मते जाणून घेण्यासाठी येत्या ५ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या आजच्या ग्रामसभेत शहरातील विविध विषयांवर वादळी चर्चा झाली.
तहकूब ग्रामसभा बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायत सभागृहात अरुण मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सुरुवातीलाच बांदा शहरातील अतिक्रमण, कचरा डेपोची समस्या, वाहतूक कोंडी, वाढिव घरपट्टी, शहरातील विविध विकासकामांसाठी झालेला खर्च, सीआरझेड, विविध शासकीय योजनांमधून करण्यात आलेली कामे यासंदर्भात वादळी चर्चा झाली. विशेष ग्रामसभा पाच जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात घेण्याचे निश्चित करण्यात आले.
हनुमंत आळवे यांनी स्मशानभूमित करण्यात आलेल्या कचरा डेपोबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे याठिकाणी दुर्घंधिचे साम्राज्य पसरले आहे. याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी केली. यासाठी दोन शासकिय जागा निर्गमीत केल्या असून या जागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. तसेच वाढिव घरपट्टीबाबत ग्रामस्थांच्या हरकती मागविण्यात आल्या असून त्या शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, गुरुनाथ सावंत, हनुमंत आळवे, सुरेश गोवेकर, संदेश भोगले, बाळु सावंत, गुरुनाथ सातोस्कर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी विविध विषयांवरुन सत्ताधारी व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
२0१५-१६ सालचे ग्रामपंचायतीचे एकूण वार्षिक अंदाजपत्रक हे १ कोटी ८२ लाख रुपयांचे होते. त्यातील १ कोटी ६७ लाख एकूण खर्ची करण्यात आलेत. तसेच २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी १0 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे ग्रामसेवक संदिप बांदेकर यांनी सांगितले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला सुमारे ५0 ग्रामस्थ उपस्थित होेते.
यावेळी माजी सरपंच शितल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अशोक सावंत, राजा सावंत, हुसेन मकानदार, अपेक्षा नाईक, रिमा गोवेकर, लक्ष्मी सावंत, अनुजा सातार्डेकर, रत्नमाला वीर, सरीता धामापूरकर, मनाली नाईक, तलाठी एम. एन. मयेकर, पोलीस पाटील चंद्रकांत कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर खान उपस्थित होेते. (प्रतिनिधी)


स्थानिकांचा रोष : कल्याणकर
४बांदा शहरातील अतिक्रमामुळे वाहतुकीची कोंडी होते असा प्रश्न हनुमंत आळवे व संदेश भोगले यांनी उपस्थित केला. मात्र, यापूर्वी अतिक्रमण हटविताना स्थानिकांच्या रोषाला ग्रामपंचायत प्रशासनाला सामोरे जावे लागत असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. त्यावेळी या विषयावर वादळी चर्चा झाली. ग्रामपंचायतीने संपूर्ण शहरातील अतिक्रमण आपल्या अधिकारात हटवावे असा ठराव घेण्यात आला. त्यामुळे लवकरच अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे.

Web Title: Banda villagers also oppose mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.