बँक युनियनचा आंदोलनाचा इशारा

By admin | Published: November 17, 2016 09:51 PM2016-11-17T21:51:52+5:302016-11-17T21:51:52+5:30

नोटाबंदी निर्णयाविरोधात एल्गार : सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे कारण

Bank union warns movement | बँक युनियनचा आंदोलनाचा इशारा

बँक युनियनचा आंदोलनाचा इशारा

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्र शासनाने बंदी घातल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना खातेदार असलेल्या सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अत्यंत घिसाडघाईने घेतलेला हा निर्णय मागे न घेतल्यास १८ नोव्हेंबर रोजी को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनमार्फत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युनियनचे सरचिटणीस नितीश शेट्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
जिल्हा बँकेमध्ये ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा बँकेत सर्वसामान्य शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य ग्राहकांची खाती आहेत. त्याचप्रमाणे वीज बिल, संस्थांचे पैसे, कर्जाचे हप्ते, मजूर संस्था, खरेदी-विक्री संस्था, आदींची खाती आहेत. दर दिवसाला सहा कोटी रुपयांची उलाढाल जिल्हा बँकेमार्फत होत असते. ९७ टक्के केवायसी देणाऱ्या या बँकेचा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात तिसरा नंबर लागतो. त्यामुळे या बँकेत खाते असणाऱ्या व कर्जाचे हप्ते अथवा किरकोळ कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा फटका बसला असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


अन्यायकारक निर्णयाचा फेरविचार करा
राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जांची येणेबाकी कोट्यवधी रुपयांची आहे. जिल्हा बँक मात्र कर्जवसुलीमध्ये अग्रेसर आहे. असे असताना जिल्हा बँकेला हेतूपुरस्सर कमी पतपुरवठा करून सर्वसामान्य जनतेच्या मनात बँकेबद्दल तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे सहकार क्षेत्रावरच मोठा परिणाम होणार आहे. या बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्य ग्राहकांबरोबर चांगले संबंध असल्यामुळे ग्राहकांना शांत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोेत. मात्र, लाखो ठेवीदारांवर अन्यायकारक ठरणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार केंद्रशासनाने केलाच पाहिजे, असे आग्रही मतही शेट्ये यांनी यावेळी व्यक्त केले.

सर्वसामान्यांच्या हितासाठी आंदोलन
केवळ पगारवाढ व इतर सोयी सुविधांसाठी कर्मचारी आंदोलन करतात असे नसून सर्वसामान्यांच्या हितासाठीसुद्धा बँक व बँकेचे कर्मचारी कटिबद्ध आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत युनियनचे सरचिटणीस नितीन शेट्ये, सहसचिव शरद सावंत, उपाध्यक्ष देवानंद लोकेगांवकर, उल्हास रानडे व युनियनचे इतर सदस्य उपस्थित होते.

Web Title: Bank union warns movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.