मुलभूत सुविधा, विकासामध्ये कुडाळ शहर पिछाडीवर

By Admin | Published: March 27, 2016 11:13 PM2016-03-27T23:13:43+5:302016-03-28T00:07:09+5:30

सध्याची स्थिती : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण ; ७४ वर्षांची ग्रामपंचायत; अनेक पदे भोगूनही विकासाकडे दुर्लक्ष

Basic facilities, trailing the city of Kudal | मुलभूत सुविधा, विकासामध्ये कुडाळ शहर पिछाडीवर

मुलभूत सुविधा, विकासामध्ये कुडाळ शहर पिछाडीवर

googlenewsNext

रजनीकांत कदम -- कुडाळ  --जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व एकेकाळी जिल्हा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ शहराचा राज्यभरात नावलौकीक आहे. मात्र, त्यामानाने आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक वाटचालीत कुडाळ शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. वास्तविक पाहता ७४ वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पदे उपभोगली आहेत. मात्र, विकासाबाबत कुणीच पुढाकार घेतलेला दिसत नाही. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांची आश्वासने मतदारांना कितपत वळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असलेल्या कुडाळ शहराला राज्याच्या राजकीय पटलावर विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रत्येक घटकाचा कुडाळ शहराला टचअप करावाच लागतो. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे राज्यातील अनेक नामवंत मंत्री, अनेक वरिष्ठ अधिकारी यांचा कायमच संपर्क येत असतो. त्यामुळे या शहराचा नावलौकीक राज्यात सर्वदूर पोहचला आहे. पण इथल्या मुलभूत सोयी सुविधा ग्रामपंचायतीच्या ७४ वर्षाच्या इतिहासात अजूनही अपूर्णावस्थेतच दिसत आहेत. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह, व्यापारीवर्ग, पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. जिल्ह्याची बाजारपेठ म्हणूनही कुडाळची ओळख आहे. पण याचे गांभिर्य इथल्या प्रशासनाने तर घेतले नाहीच पण लोकप्रतिनिधींनीही घेतले नाही.
याशिवाय गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पदे भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सध्याच्या नगरपंचायतीतही सहभाग आहे. त्यामुळे कुणाचेच कौतुक करणे वा कुणाला नावे ठेवणे योग्य ठरणार नाही. सर्वांनीच पदे भोगली पण विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीवरुन दिसत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
मच्छीमार्केट, बसस्थानक यांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. भाजी मार्केटमध्ये कोणीही बसत नाही, शहरात कशाही पद्धतीने वाढत असलेली मोठमोठी बांधकामे मात्र कोणत्या सुविधा कशा ठेवल्या पाहिजेत याचे योग्य नियोजन नाही, त्यामुळे भविष्यात शहरासमोर भेडसावणारे अनेक प्रश्न यांच्यावर योग्य ती उपाययोजना करणारी यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे सजग कार्यकर्ता आणि जागृत नेते यांनाच या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविण्यात येत आहे.

सांडपाणी, कचरा, उद्यानाचा अभाव
मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या कुडाळ शहरात लहान मुले यांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. याठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत.
शहरातील कचरा टाकायचा कुठे? हा मोठा प्रश्न प्रत्येकवेळी कुडाळ ग्रामपंचायतीसमोर उभा राहत आहे. कारण कुडाळ शहरात नियोजित असे डंपिंग ग्राऊंड नाही. सध्या भंगसाळ नदी किनाऱ्यालगतच्या एका जमिनीत कचरा टाकला जातो. मात्र, या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित होऊन आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे तेथील डंपिंग ग्राऊंडला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.


कुडाळ शहराला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना ही जुनी झाली असून तेथील पाणी साठवणुकीच्या विहिरी टाक्या याही जीर्ण होत चालल्या आहेत. तसेच एप्रिल, मे च्या उत्तरार्धात शहरातील काही भागात पाणी टंचाईचे प्रमाण हल्ली वाढत आहे. शहरातील बऱ्याचशा विहिरी दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
कुडाळ शहरात मुलांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. या ठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत.

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर या ठिकाणी अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामांचेही प्रमाण वाढत असून ही समस्याही भविष्यात कुडाळ शहरासमोर वाढत आहे. आवश्यक त्या ठिकाणी फुटपाथ नाही.
सर्वांनीच पदे भोगली पण आश्वासित विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीकडे पाहून नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Basic facilities, trailing the city of Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.