बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग हटविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:18 PM2020-12-05T18:18:18+5:302020-12-05T18:19:42+5:30
Kankavli, highway, Pwd, Sindhudurgnews कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे .
कणकवली : कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे .
याबाबत नगरपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत हा भाग हटवून याठिकाणी नवीन बॉक्सेल करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे महामार्ग ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले होते . मात्र , त्याला आमदार नीतेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विरोध करून तेथे उड्डाणपुल करण्याबाबत आग्रही मागणी केली होती .
दरम्यान, या बॉक्सेल ब्रिजच्या वरील भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज कोसळला होता. त्या वरील बाजूचा सिमेंट काँक्रीट रस्ता ब्रेकर द्वारे तोडण्यात येत आहे . वरील काही भाग ब्रेकर द्वारे कट करण्यात आला असून , उर्वरित भाग लवकरच काढण्यात येणार आहे.
बॉक्सेल ब्रिजच्या वरील भागात अनेक ठिकाणी उभ्या भेगा गेल्या असून, कोसळलेल्या ठिकाणाहून एस. एम हायस्कूलच्या अंडरपास पर्यंतचा पूर्णच काँक्रीट रस्ता काढून त्याजागी नव्याने रस्ता करावा लागणार आहे.
नगरपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत आताच्या बॉक्सेल ब्रिज असलेल्या भागात उड्डाणपुलासाठी ४० कोटींचा खर्च प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप तेथील उड्डाणपुलाला मंजुरी नसल्याने बॉक्सेल ब्रिजचा संपूर्ण भाग काढणार की फक्त एस. एम. हायस्कूल पर्यंत भाग काढून काम उरकले जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे .
कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे .