सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

By admin | Published: April 13, 2016 10:53 PM2016-04-13T22:53:07+5:302016-04-13T23:23:59+5:30

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : खुले आरक्षण, दिग्गज उमेदवार, लढतीकडे सर्वांचेच लक्ष--कुडाळ गावाकडून नगराकडे

Being the highest candidate is the fight against the challenge | सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

Next

रजनीकांत कदम -- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये सांगिर्डेवाडी मध्ये सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीत उतरले असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रणधुमाळी उडणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराची इथे सरशी ठरणार हे मात्र सध्या तरी कोणीच सांगू शकत नाहीत.
कुडाळ नगरपंचायतीचा शेवटचा म्हणजे प्रभाग क्र. १७ सांगिर्डेवाडी आहे. या प्रभागामध्ये खुला संवर्ग असे आरक्षण पडले असून या प्रभागाची एकूण मतदार संख्या ८४१ आहे तर यामध्ये पुरुष ४०९ व महिला ४३२ एवढे मतदार आहेत.
या प्रभागामध्ये विनायक राणे (काँग्रेस), अभय शिरसाट (शिवसेना), वैभव परब (भाजप), तर अपक्ष म्हणून विलास राणे, वैभव राणे, अमित राणे, अशोक केरकर, सिताराम नेमळेकर, नीलेश परब असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक विहिरींची योग्य प्रकारे निगा राखणे, गटार व्यवस्था, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच अन्य मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. या प्रभागात निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वात जास्त उमेदवार असल्याने या ठिकाणी कोण विजयी होणार याची ओढ कुडाळवासियांना लागली असून याबाबत १८ एप्रिल रोजी पर्यंत कुडाळवासीयांना वाट बघावी लागणार आहे. आज मतदान प्रत्यक्षात तीन दिवसावर येऊन ठेपल्याने रंगत वाढली आहे.

अभय शिरसाट-विनायक राणे आमने-सामने
या नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांचा विचार करता या प्रभागात सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागणी या नऊ उमेदवारांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे शिवसेनेतून व या प्रभागाचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व कुडाळचे उपसरपंच विनायक राणे हे काँग्रेसमधून लढत असून हे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.


अपक्षांचा त्रास मोठ्या प्रमाणावर
या प्रभागात मोठ्या प्रमाणात अपक्ष असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास येथील राजकीय पक्षांना पडणाऱ्या मताधिक्क्यावर होणार आहे.
आपल्याकडील असलेली मते राखून ती मते दुसरीकडे जावू नयेत याकरिता प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागणार आहे.
येथील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: Being the highest candidate is the fight against the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.