भंडारी समाजाने एकजुटीने विकास करावा
By admin | Published: August 30, 2015 11:56 PM2015-08-30T23:56:19+5:302015-08-30T23:56:19+5:30
गुरूनाथ पेडणेकर : तळवडेत भंडारी समाज मेळावा
तळवडे : भंडारी समाजाने एकत्र येऊन आपली एकजूट दाखावावी. जिल्ह्यात भंडारी समाजाची संख्या जास्त आहे; पण एकजूट नाही, अशी खंत व्यक्त करीत आणण एकजूट दाखविल्यास आपणच आपला विकास करू शकतो, असे ठाम मत तळवडे येथे भंडारी समाज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी केले.
या मेळाव्यावेळी तळवडे येथे नव्यानेच भंडारी समाज मंडळाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त तळवडे पंचक्रोशीतील भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळवडे, होडावडे, मातोंड, पेंडूर, निरवडे येथील भंडारी समाजबांधव एकत्र आले होते. तळवडे या ठिकाणी भाई पेडणेकर यांच्या घरी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पेडणेकर म्हणाले, आज भंडारी समाजाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या समाजातील लोक हे चिकाटी व जिद्दीवान असतात. त्यामुळे आपण एकजूट दाखवावी. कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण आपली जात, कर्तव्ये विसरू नयेत, असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष मामा माडये, सावंतवाडी तालुका भंडारी समाज अध्यक्ष राजाराम वराडकर, माजी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी सुनील नाईक, दशरथ घाडी, लक्ष्मण धुरी, तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, वैशाली पटेकर, तळवडे भंडारी समाज अध्यक्ष प्रवीण कोंडये, मळगावचे सरपंच गणेश पेडणेकर, भाई पेडणेकर, विजय रेडकर, तालुका पदाधिकारी बाळू साळगावकर, सुनंदा मयेकर, नीळकंठ नागडे, भूषण पेडणेकर, प्रशांत बुगडे, नंदकिशोर बुगडे, दादा पेडणेकर, प्रसाद आडेलकर तसेच तळवडे गावातील भंडारी समाजबांधव, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.तळवडे गावात प्रथम भंडारी समाजाचा बऱ्याच वर्षांनंतर मेळावा आयोजित करण्यात आला. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मामा माडये म्हणाले, आज भंडारी समाजाला एकजूट करून आपली ताकद दाखविणे गरजेचे आहे. तरच समाजाचा विकास शक्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.