सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2023 04:36 PM2023-11-11T16:36:42+5:302023-11-11T16:38:39+5:30

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक ...

Birds of Sindhudurga on postal cards of the Indian Postal Department | सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक विभागाने यावर्षी पश्चिम घाटातील प्रदेशानिष्ठ व संकटग्रस्त प्रजातीतील पक्षी आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केले आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये काढलेले ग्रे हेडेड बुलबुल (राखी डोक्याचा बुलबुल ) हा पक्षी भारतीय डाक विभागाने राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केला. या पक्षाचे छायाचित्र पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेले होते. 

त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, विश्वस्त उर्वशीराजे भोंसले, श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रे हेडेड बुलबुल हा पक्षी संकटग्रस्त प्रजातीतील असून हा पक्षी फक्त पश्चिम घाटात सापडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र डोंगर , पांग्रड, बर्ड हाईड कुडाळ, आचरा, तळकट, तिलारी, मळगाव, बांदा या ठिकाणी सापडतो. हा पक्षी पाहण्यासाठी भारताच्या विविध भागातून पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात.

Web Title: Birds of Sindhudurga on postal cards of the Indian Postal Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.